Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सुनील ग्रोव्हरसह कलाकार न आल्याने ‘द कपिल शर्मा शो’चे शूटिंग रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 16:23 IST

कपिल शर्माने केलेल्या भांडणामुळे सुनील ग्रोव्हरसह चंदन प्रभाकर, अली असगर हे कलाकार न आल्याने ‘ द कपिल शर्मा शो’चे ...

कपिल शर्माने केलेल्या भांडणामुळे सुनील ग्रोव्हरसह चंदन प्रभाकर, अली असगर हे कलाकार न आल्याने ‘ द कपिल शर्मा शो’चे शूटिंग रद्द करावे लागले. कपिलच्या या व्यवहारामुळे हे सारे कलाकार नाराज झाले आहेत. त्यांनी हा शो सोडून जाण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांचे शूटिंग करण्याचा निर्णय कपिलने घेतला, मात्र बुधवारी हे कलाकार न आल्याने शूटिंग रद्द करावे लागले. सलग तिसºया दिवशीही सुनील ग्रोव्हर, अली असगर आणि चंदन प्रभाकर शूटिंगसाठी आले नाहीत.सोमवार आणि मंगळवारी कपिलने राजू श्रीवास्तव, सुनील पाल आणि अहसान कुरेशी यांच्यासारख्या कॉमेडियन्सच्या मदतीने शूटिंग केले. त्यामुळे तापसी पन्नू, मनोज वाजपेयी यांच्यासोबतच्या एपिसोडचे शूटिंग होऊ शकले. बुधवारीदेखील हे कलाकार न आल्याने शूटिंग रद्द करावे लागले.अर्थात सोनी चॅनलच्या जनसंपर्क अधिकाºयांनी याबाबतीत बोलण्यास नकार दिला. कपिल शर्मा आणि त्यांच्या सहकाºयांनी या चॅनलवर अनेक विक्रम स्थापित केले होते. कपिल आणि सुनीलच्या वादानंतर मात्र या शोला उतरती कळा लागली. बुधवारी तर या सर्वांवर कडीच झाली. स्पॉटबॉयच्या अनुसार केवळ किकू शारदा आणि रोशेल मारिया राव यांच्या समवेत कशापद्धतीने शूटिंग करावयाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. तापसी पन्नू हिने या शोबाबतचा फोटो शेअर केला आहे.१६ मार्च रोजी कपिल आणि त्याची टीम मेलबर्नहून येत असताना कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात वाद झाला. कपिलने शिवीगाळ करीत बूट फेकून मारला. नशेत कपिल शर्माने मोठ्या आवाजात गोंधळ घातला. अर्थात कपिलने फेसबुकवर सुनील ग्रोव्हर आणि आपल्या टीमची माफीही मागितली होती.