Join us

मायावतींना ‘जादू की झप्पी-पप्पी’ देण्याची इच्छा व्यक्त करणाºया संजय दत्तला पुन्हा करावी लागेल न्यायालयाची वारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 20:12 IST

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्हा न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला बहुजन समाज पक्षाच्या सुप्रिमो आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांच्याबद्दल ...

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्हा न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला बहुजन समाज पक्षाच्या सुप्रिमो आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांच्याबद्दल अभद्र वक्तव्य केल्याप्रकरणी समन्स बजाविला आहे. त्यामुळे संजूबाबाला येत्या १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. हे संपूर्ण प्रकरण २००९ मधील आहे. जेव्हा २००९ मध्ये उत्तर प्रदेशात निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती, त्यादरम्यान एक जाहीर सभेत संजूबाबाने बसपा सुप्रिमो मायावती यांच्यावर हास्यास्पद टिपणी करताना त्यांची खिल्ली उडविली होती. जनतेसमोर आपल्या भावना मांडताना संजय दत्तने म्हटले होते की, ‘मला मायावती यांना जादू की झप्पी आणि जादूची पप्पी द्यायची आहे.’ त्याच्या या वक्तव्यावर त्यावेळी लोकांनी प्रचंड टाळ्या वाजविल्या होत्या. परंतु आता त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण त्याचकाळी संजय दत्त विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचसंदर्भात जिल्हा न्यायाधीशांनी त्याला समन्स बजाविला आहे. संजय दत्तच्या या भाषणाचे जिल्हा प्रशासनाने व्हिडीओ शुटिंगदेखील केले होते. याच आधारावर संजय दत्तविरोधात कलम २९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक उच्च न्यायालयाने या प्रकरणावर स्टे आणला होता. मात्र २८ नोव्हेंबर २०१६ रोजी हा स्टे हटविण्यात आला होता. लवकरच संजय दत्तच्या जीवनावर आधारित बायोपिक रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली आहे. या बायोपिकमध्ये संजूबाबाच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक घटना दाखविण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी संजूबाबाची पत्नी चित्रपटातील तिच्या भूमिकेवरून खूपच डिस्टर्ब होती. तिला तिच्या भूमिकेविषयी जाणून घ्यायचे होते. चित्रपटात दिया मिर्झादेखील एक महत्त्वपूर्ण भूमिकेत बघावयास मिळणार आहे.