Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंडोशेनियाच्या फॅनचे शाहरूखला भेटण्याचे स्वप्न साकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 09:33 IST

 बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानला भेटण्यासाठी त्याचे चाहते कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शक तात याचे काही वेगळे स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत ...

 बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानला भेटण्यासाठी त्याचे चाहते कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शक तात याचे काही वेगळे स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. त्याचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला चित्रपट ‘फॅन’ हा याचे अतिशय उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.यात त्याने दुहेरी भूमिका केली होती. आणि दाखवून दिले होते की, ‘कलाकाराच्या आयुष्यात फॅनचे असणे किती आवश्यक असते. ’ असाच काहीसा अनुभव शाहरूख खानला अनुभवायला मिळाला. त्याची इंडोनेशिया येथील एक फॅन त्याला भेटण्यासाठी सतत टिवट करत होती.आणि मग काय ? शाहरूखही तिला भेटण्यासाठी तयार झाला. अशाप्रकारे शाहरूखला भेटण्यासाठी काहीही करायला तयार असलेल्या चाहतीचे स्वप्न पूर्ण झाले.