Join us

ड्रामा क्वीन राखी सावंतनं साधला प्रियंका चोप्रावर निशाणा, म्हणाली - 'मलई खाऊन दुसऱ्या ठिकाणी…'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 14:00 IST

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने नुकतंच बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केले आहे. मी या राजकारणाला कंटाळूनच हॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असे प्रियांका चोप्रा म्हणाली.

बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, तिला बॉलिवूड इंडस्ट्रीतून बाजूला करण्यात आले. तिला कोणीही चित्रपटात काम द्यायला तयार नव्हते, त्यामुळे ती हॉलिवूडकडे वळली. दरम्यान आता या प्रकरणावर इंडस्ट्रीची ड्रामा क्वीन राखी सावंत(Rakhi Sawant)ची प्रतिक्रिया समोर आली आहे.

प्रियांका चोप्राच्या बॉलिवूडच्या संदर्भातील वक्तव्यावर राखीने आपले मत मांडले आहे. या प्रकरणी ती एवढ्या उशिरा का बोलत आहे, असे तिने म्हटले आहे. यापूर्वी ती जेव्हा इंडस्ट्रीत काम करत होती तेव्हा ती का बोलली नाही. मी कोणाचेही समर्थन न करता खरे बोलेन. मला प्रियंका आवडते ती माझी चांगली मैत्रीण आहे. त्याच्या आईशीही माझे चांगले संबंध आहेत. इतके चित्रपट केले आणि इतके पुरस्कार मिळाले, मग तेव्हा काही का बोलली नाही. आज ती अमेरिकेत स्थायिक झाली आहे, मग ती आता असे का बोलत आहे.

तसेच राखी सावंतचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात ती प्रियंकाच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाली की, प्रियांका चोप्राने बॉलिवूडबद्दल जे काही सांगितलंय, तितके काही इंडस्ट्रीत होत नाही. देव तुमचे नशीब लिहून पाठवतो आणि तुमच्या नशिबात जे असते ते तुम्हाला मिळते. त्यासाठी मेहनत करावी लागते. स्वत:ला फिट ठेवावे लागते. मी अनेकदा पडली आहे, पण तरीही स्वत:च्या पायावर उभी राहिली. पण आता जर मी संपूर्ण मलई खाऊन दुसऱ्या ठिकाणी जात असेन तर मी माझ्या बॉलिवूडला कधीच बदनाम करणार नाही. कारण माझ्या बॉलिवूडने मला नाव दिले आहे. ती माझी कर्मभूमी आहे. त्याने मला बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत. मला कोण काय बोलते याबद्दल काहीही घेणे देणे नाही.

प्रियांका चोप्राने नुकतेच एका पॉडकास्ट शोमध्ये खुलासा केला होता की, बॉलिवूड इंडस्ट्रीत तिला खूप त्रास सहन करावा लागला होता. चित्रपटात तिला कोणी काम देत नव्हते. तिच्याविरोधात राजकारण केले जात होते, त्यामुळे ती बॉलिवूड सोडून अमेरिकेत स्थायिक झाली. तिचा खुलासा खूपच धक्कादायक होता. अभिनेत्रीला इतके वाईट वागणूक दिली गेली यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. 

टॅग्स :प्रियंका चोप्राराखी सावंत