dont follow the rumors :सलमान खान अक्षयसोबत चित्रपट करणारच !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 14:20 IST
सलमान खान शब्दाचा पक्का आहे. होय, सलमानने एकदा का कमिटमेंट केली की, तो स्वत:चेही ऐकत नाही. अशा आशयाचा डायलॉग ...
dont follow the rumors :सलमान खान अक्षयसोबत चित्रपट करणारच !!
सलमान खान शब्दाचा पक्का आहे. होय, सलमानने एकदा का कमिटमेंट केली की, तो स्वत:चेही ऐकत नाही. अशा आशयाचा डायलॉग तुम्हाला आठवत असेलच. पण केवळ डायलॉग पुरतेच नाही तर रिअल लाईफमध्ये सुद्धा सलमान खान शब्दाचा पक्का आहे. असे नसते तर त्याने दिलेला शब्द पाळला नसता. होय, खुद्द सलमानने तो शब्दाचा किती पक्का आहे, हे दाखवून दिले आहे. विश्वास बसत नसेल तर त्याचे ताजे ट्विट तुम्ही पाहायलाच हवे. होय, सलमान खान अक्षय कुमार आणि करण जोहरसोबत मिळून एक चित्रपट प्रोड्यूस करणार आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. हा चित्रपट बॅटल आॅफ सारागडीवर आधारित आहे. योगायोग म्हणजे, अभिनेता अजय देवगण हा सुद्धा याच विषयावर चित्रपट बनवतो आहे. याचवरून एक अफवा पसरली होती. होय, अजय याच विषयावर चित्रपट बनवतो आहे, हे कळल्यावर सलमानने अजयला साथ देत, अक्षय व करणसोबतच्या प्रोजेक्टमधून अंग बाहेर काढले, अशी ही अफवा होती. या बातमीने अनेकांना धक्का बसला होता. पण अखेर सलमानने यावर खुलासा करणे पसंत केले. मी अक्षयसोबत चित्रपट करतो आहे, असे त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर जारी करून टाकले. अफवांवर विश्वास ठेवू नका़ माझ्यावर विश्वास ठेवा़ कारण ‘एक बार जो मैने कमिटमेंट कर दी तो फिर...’ अक्षयसोबत मी चित्रपट करतोय, असे ट्विट त्याने केले. }}}}एकंदर काय, तर आता चित्र एकदम स्पष्ट झाले आहे. सलमान अक्षयसोबत मिळून चित्रपट प्रोड्यूस करतोय आणि करतोय.