Join us
Daily Top 2Weekly Top 5

करुन करुन भागली आणि देवपूजेला लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 11:09 IST

बिग बॉस या रियालिटी शोमधील वादग्रस्त सोफिया हयात मदर सोफिया बनलंय हे आता सा-यांनाच माहित पडलंय. मात्र बोल्डनेसमुळं कायम ...

बिग बॉस या रियालिटी शोमधील वादग्रस्त सोफिया हयात मदर सोफिया बनलंय हे आता सा-यांनाच माहित पडलंय. मात्र बोल्डनेसमुळं कायम चर्चेत राहणारी सोफिया आता देवपूजेला लागलीय. त्यामुळंच की काय हॉट आणि सेक्सी अदांचा भरणा असलेला SIX-X हा आपला सिनेमा कुणीही पाहू नये अशी सोफियाची इच्छा आहे. या एडल्ट सिनेमात सोफिया आणि अश्मित पटेलवर बेड सीनपासून ते अनेक हॉट सीन्स चित्रीत करण्यात आलेत. सोफियाचा हा हॉट आणि बिनधास्त अंदाज रसिकांना घायाळ करतोय. मात्र आता नन बनल्यानंतर मात्र सोफियाला उपरती झाली. सेक्सी हॉट अदांचा हा सिनेमा कुणीही पाहू नये असं सोफियानं सांगणं म्हणजे करुन करुन भागली आणि देवपूजेला लागली.