Join us

​का समांथा रुथवर वेळ आली इतके स्वस्त कपडे घालण्याची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 17:17 IST

दक्षिणेचा सुपरस्टार नागार्जुन याचा लेक चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभू शुक्रवारी रेशीमगाठीत अडकलेत. एका राजेशाही आणि तितक्याच शानदार ...

दक्षिणेचा सुपरस्टार नागार्जुन याचा लेक चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभू शुक्रवारी रेशीमगाठीत अडकलेत. एका राजेशाही आणि तितक्याच शानदार सोहळ्यात चैतन्य आणि समांथाचा लग्न सोहळा पार पडला. नवदाम्पत्याचा लूक, राजेशाही थाटातील सोहळा, दागदागिने आणि दिग्गजांची उपस्थिती यामुळे हा सोहळा वर्षभरातील सगळ्यात मोठा सेलिब्रिटी लग्नसोहळा ठरला. तब्बल दहा कोटी रुपये खर्च या सोहळ्यावर खर्च झाल्याचं म्हटले जाते. समांथाने लग्नानंतर पहिल्यांदा एका सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावली. समांथा ही स्वतः करोडपती आहे तर तिने लग्न देखील एका करोडपती कुटुंबात केले आहे. तिच्या लग्नाच्या खर्चाची तर आजदेखील चर्चा केली जाते. त्यामुळे समांथा सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावेल, त्यादिवशी ती अतिशय महागड्या कपड्यात दिसेल अशी सगळ्यांना आशा होती. पण तिच्या फॅन्सची निराशा झाली.समांथा रुथ नुकतीच एका इव्हेंटला उपस्थित राहिली होती. समांथा नेहमीच बँडेड कपडे घालते. तिचे कपडे हे अनेकवेळा लाखोंमध्ये असतात. पण या इव्हेंटमध्ये तिने घातलेले कपडे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. समंथाने या कार्यक्रमात झारा या कंपनीचा पांढऱ्या रंगाचा टॉप आणि ट्राऊजर घातला होता. या ट्राऊजरची किंमत ही केवळ १९०० रुपये तर टॉपची किंमत १५०० रुपये होती. केवळ ३४०० रुपयांच्या कपड्यांमध्ये समंथा दिल्याने सगळ्यांनाच शॉक बसला. समंथाने या कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल तिच्या सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सना सांगितले आहे. तिने तिचा या इव्हेंटमधील फोटो पोस्ट करून त्यासोबत मी माझाच्या इव्हेटला गेले होते. तिथे कॅज्युअल कपडे घालणे मी पसंत केले.साऊथ स्टार अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रुथने ऑक्टोबरमध्ये लग्न केले होते. यांच्या लग्नाची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. ६ आॅक्टोबर रोजी दोघांनी गोवा येथील डब्ल्यू हॉटेलमध्ये हिंदू रितीरिवाजाने लग्न केले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ आॅक्टोबरला नागा चैतन्य आणि समांथा या दोघांनी कॅथलिक रितीरिवाजानुसार लग्न केले. Also Read : 10 कोटींच्या राजेशाही विवाह सोहळ्यात असं काय घडलं की समांथाला रडू कोसळलं ?