Join us

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले - त्याला या गोष्टीचा होता पश्चाताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 16:03 IST

अभिनेता सुशांत सिंग राजपूत डिप्रेशनवर ज्या डॉक्टरांकडे ट्रिटमेंट घेत होता. त्या डॉक्टरांनी सुशांत संदर्भात बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जूनला वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. त्याच्या आत्महत्येनंतर कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. तो डिप्रेशनमध्ये त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे आणि तो त्यावर उपचारही घेत होता. त्यात आता मुंबई पोलिसांनी मानोसोपचार तज्ज्ञ केसरी चावडा यांचे स्टेटमेंट घेतले आहे. यावेळी सुशांत सिंग राजपूतच्या मानसोपचार तज्ज्ञांनी खुलासा केला आहे की सुशांत त्याच्या एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला खूप मिस करत होता आणि त्याला ब्रेकअपचा खूप पश्चाताप झाला होता. 

सुशांतच्या मानसोपचार तज्ज्ञांनी त्याच्या स्वास्थ आणि एक्स गर्लफ्रेंडबद्दल चकीत करणारे असे खुलासे केले आहेत. ब्रेकिंग बूमच्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी खुलासा केला की, सुशांतला पवित्र रिश्तामधील सहकलाकार अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप केल्याचा पश्चाताप होत होता. 

मीडिया रिपोर्टनुसार, सुशांत मागील सहा महिन्यात तीनदा डॉक्टरकडे गेला होता. डॉक्टरांनी सांगितले की, सुशांत गेल्या एक वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होता. रात्री त्याला झोप येत नव्हती. त्याच्या मनात विचित्र विचार येत होते. अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्याच्या काही कालावधीनंतर काही काळ सर्वकाही सुरळीत चालू होते. मात्र काही अयशस्वी रिलेशनशीपमुळे त्याला जाणीव झाली की त्याला कुणीच पसंत करत नव्हते. डॉक्टरांनी कृती सेनॉन आणि एका दिग्दर्शकाच्या मुलीचाही उल्लेख केला आहे, ज्यांच्यासोबत सुशांत रिलेशनशीपमध्ये होता. दोन्ही नाते अयशस्वी ठरले.

त्यानंतर रिपोर्टमध्ये हेदेखील सांगितले की, सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या वर्तणूकीने तो खूश नव्हता. त्यांच्यात सारखे खटके उडत होते. डॉक्टरांनी सांगितले की, सुशांत वेगवेगळ्या गोष्टीबद्दल विचार करत होता. मुंबई पोलिसांनी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी कित्येक लोकांना स्टेटमेंटसाठी बोलवले आहे. रिया चक्रवर्तीसोबत पोलिसांनी जवळपास नऊ तास चौकशी केली होती.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअंकिता लोखंडेरिया चक्रवर्तीक्रिती सनॉन