Join us

दुखापत झालेल्या आलियाला डॉक्टरांनी दिला 'ही' ट्रीटमेंट करण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 13:16 IST

आलिया भट्ट आपला आगामी चित्रपट ब्रम्ह्रास्त्रच्या शूटिंग दरम्यान अपघात झाला असल्याचे आम्ही तुम्हाला याआधीच सांगितले आहे. बल्गेरियामध्ये  ब्रह्मास्त्रच्या शूटिंग ...

आलिया भट्ट आपला आगामी चित्रपट ब्रम्ह्रास्त्रच्या शूटिंग दरम्यान अपघात झाला असल्याचे आम्ही तुम्हाला याआधीच सांगितले आहे. बल्गेरियामध्ये  ब्रह्मास्त्रच्या शूटिंग दरम्यान हा अपघात घडला होता. आलियाच्या खांद्याला दुखापत झाली आहे. तिला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार आलियाला फिजियोथेरेपी ट्रीटमेंट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आलिया शूटिंगमध्ये ब्रेक घेऊऩ मुंबईत परतली आहे. डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार आलियाला अजून पूर्णपणे तिच्या हाताची हालचाल करतायेत नाही आहे. आलियाला झालेल्या दुखापतीमुळे पुढचे 15 दिवस ती अॅक्शन सीन्सचे शूट करू शकत नाही आहे. यामुळे मेकर्सनी चित्रपटाच्या शूटिंगचे शेड्यूल पुढे ढकलले आहे. एका अॅक्शन सीनचे  शूट करत असताना आलियाच्या खांद्याला दुखापत झाली आहे.  या चित्रपटासाठी रणबीर आणि आलिया अनेक दिवसांपासून मेहनत घेतायेत. दोघांनी यासाठी घोडेस्वारीचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात आपल्याला भरपूर अॅक्शन दिसणार आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग  १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात मौनी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मौनी या चित्रपटात नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. रणबीरच्या रस्त्यात अडचणी टाकण्याचे काम करणार आहे. लवकरच आलिया राजी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुलजार यांची मुलगी मेघना गुलजार करते आहे. यात आलियाचा विवाह पकिस्तानी लष्कर अधिकाºयाशी होतो. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान आलिया भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी अधिकाºयांना देते, असे याचे कथानक आहे. राजीमधून आलिया पहिल्यांदाच आपली आई सोनी राजदानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सहमत या कांदबरीवर आधारित आहे. या पाकिस्तानी अधिकाऱ्याची भूमिका विक्की कौशल साकारतो आहे. हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन प्रोड्यूस करतो आहे.