Join us

तुम्हाला हवी आहे का दीपिका पादुकोणसारखी फिगर?, तर फॉलो करा तिचा हा फिटनेस फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 18:31 IST

दीपिका फक्त डाएटच करत नाही तर वर्कआऊटही करते.

बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने तिच्या चित्रपटातील भूमिकेसोबतच तिच्या फिटनेसनं सर्वांना भुरळ पाडली आहे. इतर कलाकारांप्रमाणे दीपिकाही फिटनेस फ्रिक आहे. विशेष म्हणजे ती तिच्या डाएट प्लानकडे जास्त लक्ष देते. ती कधीही उपाशी राहून डाएट करत नाही. ती दिवसातून सहा वेळा खाऊन तिचा डाएट प्लान फॉलो करते आणि त्यामुळेच ती फिट व ग्लॅमरसही दिसते.

सूत्रांच्या माहितीनुसार, दीपिका पादुकोण दिवसातून सहा वेळा थोड्या थोड्या प्रमाणात जेवण करते. या जेवणामध्ये कायम पौष्टीक पदार्थांचा समावेश असतो. ती सकाळी कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिक्स करुन पाणी पिते. त्यानंतर नाश्त्यामध्ये दोन उकडलेली अंडी, २ बदाम, एक ग्लास लो फॅट मिल्क, २ इडली किंवा २ प्लेन डोसा, उपमा हे पदार्थ खाते.

तर ती दुपारच्या जेवणापूर्वी फळं खाते. त्यानंतर घरी तयार केलेल्याच पदार्थांचा जेवणामध्ये समावेश करते. या जेवणात ती पोळी, भाजी, सॅलड आणि दही खाते किंवा कधी कधी ग्रील्ड फिशसुद्धा खाते. विशेष म्हणजे संध्याकाळचा नाश्तादेखील ती पौष्टीकच करते. यात फिल्टर कॉफी, सुका मेवा आणि फळं खाते. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये ती पोळी, भाजी, फ्रेश ग्रीन सॅलड, फळं खाते. त्यासोबतच नारळाचं पाणी किंवा फळांच्या रसाचं सेवन करते. विशेष म्हणजे दीपिका डेझर्टसुद्धा खाते. यात ती कायम डार्क चॉकलेटच खाते.

दीपिका फक्त डाएटच करत नाही तर वर्कआऊटही करते.

तुम्हालाही दीपिकासारखी फिगर हवी असेल तर तिचा फिटनेस फंडा नक्की फॉलो करा.

टॅग्स :दीपिका पादुकोणफिटनेस टिप्स