शाहिदच्या प्री-बर्थ डे पार्टीतील रणवीर सिंहचा हा ‘कंडोम ड्रेस’ तुम्ही पाहिलात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 09:45 IST
काल रविवारी अभिनेता शाहिद कपूर याची प्री-बर्थ डे पार्टी भलतीच रंगली. वरूण धवन आणि त्याची गर्लफ्रेन्ड नताशा दलाल या ...
शाहिदच्या प्री-बर्थ डे पार्टीतील रणवीर सिंहचा हा ‘कंडोम ड्रेस’ तुम्ही पाहिलात?
काल रविवारी अभिनेता शाहिद कपूर याची प्री-बर्थ डे पार्टी भलतीच रंगली. वरूण धवन आणि त्याची गर्लफ्रेन्ड नताशा दलाल या पार्टीत हातात हात घालून आलेत. यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट हे दोघेही एकाच कारमधून पार्टीला पोहोचले. या लव्ह बर्ड्सनी पार्टीत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय आणखी एका ‘कपल’वर यावेळी सगळ्यांच्या नजरा खिळल्या. होय, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या दोघांवर. त्यातल्या त्यात रणवीरवर तर अधिक़ याला कारण म्हणजे रणवीरचा चित्रविचित्र ड्रेस. होय, या पार्टीत अनेक कलाकार हटके लूकमध्ये दिसले. पण रणवीर? रणवीर एकदम मजेदार ड्रेसमध्ये आला. हो, कंडोमच्या ड्रेसमध्ये. म्हणजे, कंडोमसारख्या डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये. आता हा कंडोमसारखा डिझाईन केलेला ड्रेस कसा असतो? हे आम्ही तुम्हाला नेमके सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला रणवीरचे हे काही फोटोच पाहावे लागतील. रणवीरचा पार्टीतील हा ‘कंडोम ड्रेस’ चांगलाच चर्चेचा विषय ठरला. पण बिनधास्त, ‘बेफिक्रे’ रणवीर त्याची पर्वा थोडीच करतो. यापूर्वी रणवीर अनेकदा अशाच चित्र-विचित्र ड्रेसमध्ये दिसला आहे. त्याच्या या विचित्र ड्रेसिंग सेन्सवर प्रसंगह टीकाही झाली आहे. पण रणवीरला त्याच्याशी जराही देणेघेणे नाही. रणवीरच्या ‘कंडोम ड्रेस’वर दीपिकाची काय प्रतिक्रिया होती, हे अद्याप तरी कळलेले नाही. पण शेवटी रणवीरचा हाच बिनधास्त, ‘बेफिक्रे’ स्वभावच तर दीपिकाला आवडतो ना?ALSO READ : OhYes !! ‘गल्ली बॉईज’साठी रणवीर सिंह लिहिणार ‘रॅप’!रणवीरच्या या ड्रेसला आल्या अशा कमेंट्स...रणवीर व दीपिका हे दोघेही सध्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहेत. अलीकडे रणवीरचा ‘बेफिक्रे’ हा चित्रपट येऊन गेला. पण बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाला म्हणावे तसे यश लाभले नाही.