Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला माहिती आहे सोनम कपूरचा होणारा नवरा आनंद अहुजा कोण आहे तो ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 11:45 IST

सोनम कपूर आणि आनंद अहुजा याच्या लग्नाची अधिकारिक घोषणा करण्यात आली आहे. आजपासून ठिक 6 व्या दिवशी सोनम कपूर ...

सोनम कपूर आणि आनंद अहुजा याच्या लग्नाची अधिकारिक घोषणा करण्यात आली आहे. आजपासून ठिक 6 व्या दिवशी सोनम कपूर मिसेस अहुजा होणार आहे. सोनमच्या फॅन्सना नक्कीच हे जाणून घ्यायची उत्सुकता असेल की आनंद अहुजा नक्की कोण आहे ?, तो काय करतो ?, त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे ? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात पडले असतील. आम्ही तुम्हाला सांगतो आनंद अहुजा कोण आहे आणि काय करतो. आनंद हा एका  दिल्ली बेस्ड बिझनेसमन आहे. त्याचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे. आनंद फॅशन ब्राँड Bhane चा मालक आहे. सोनमचा Bhane हा फेव्हरेट ब्राँड आहे. त्यामुळे बºयाचदा सोनम Bhane ने डिझाइन केलेले कपडे परिधान करून स्पॉट झाली आहे. तो प्रसिद्ध बिझनेसमन हरीश अहुजा यांचा नातू आहे. आनंदचे वर्षाकाठीचे उत्पन्न  सुमारे २८ अरब इतके आहे. आनंदला फिरण्याशिवाय शूज आणि कारचा देखील आवडतात.  आनंद आणि सोनमच्या अफेअरची चर्चा 2016पासून आहे. मात्र सोनम आणि आनंदने कधीही त्यांच्यातील रिलेशनशिपविषयी जाहिरपणे सांगितले नाही. दोघीनीही नाते प्रायव्हेट ठेवले होते. मात्र त्यांच्यातल्या केमिस्ट्रीमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. ALSO READ :  सोनम कपूर आणि आनंद अहुजाच्या लग्नाची तारीख ठरली, कुटुंबीयांनी कन्फर्म केली तारीख1 जूनला सोनम आपल्या वीरे दी वेडिंगमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सोनमशिवाय करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. सोनम कपूरची बहीण रेहा कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत