प्रियांका चोप्राबद्दलच्या या वैयक्तिक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 11:48 IST
वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी प्रियांका चोप्राने २००० मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. प्रियांका बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींने पैकी एक ...
प्रियांका चोप्राबद्दलच्या या वैयक्तिक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?
वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी प्रियांका चोप्राने २००० मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. प्रियांका बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींने पैकी एक आहे. ती आज बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेण्याऱ्या कलाकारांपैकी एक आहे. प्रियांकाने बॉलिवूड बरोबर हॉलिवूडमध्ये सुद्धा स्वत:चे वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे त्यामुळे तिचे चाहते जगभरात आहेत. तिच्या बद्दल जाणून घ्यायला तिच्या फॅन्सना नेहमीच आवडते. अश्याच प्रियांका बद्दलच्या काही इंटरेस्टींग गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. १. बऱ्याच लोकांचा असा समज आहे कि 'द हिरो :अ लव्ह स्टोरी ऑफ स्पाय' हा प्रियांकाचा पहिला चित्रपट आहे. पण असे नाही आहे प्रियांकाने २००२मध्ये तामिळ चित्रपट 'थमिजान' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. यात तिच्या अपोझिट विजय होता.२. वयाच्या १८ व्या वर्षी प्रियांकाने मिस वर्ल्डचा किताब पटकावला ती मॉडेलिंग ही करत होती पण फार कमी लोकांना माहिती आहे की प्रियांकाला मॉडेलिंग मध्ये यायच्या आधी तिला इंजिनीरिंग करायचे होते.३. प्रियांकाला तिचा मित्र परिवार "मिमी आणि शनसाइन" या नावाने हाक मारतात.४. प्रियांकाचा जंक फूड खाण्यात सर्वात पहिला नंबर आहे. तिला फ्रेंच फ्राईस, पिझ्झा सारखे पदार्थ खायला आवडतात. प्रियंकाला मिठाई, चॉकलेट सुद्धा खूप आवडतात ती नेहमी चॉकलेट आपल्या बरोबर ठेवते.५. जंक फूड खाणारी प्रियांकाला तिच्या फेव्हरेट फूड बद्दल विचारले असता तिला जे आवडते ह्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तिला खिचडी आणि लोणचे खायला भरपूर आवडते. तसेच लवकरच प्रियांका लवकरच बॉलिवूडमध्ये सुद्धा परतणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका आमीरचा 'सैल्यूट' चित्रपटाचा भाग बनू शकते. यात आमीर खान अंतराळवीर राकेश शर्मा यांची भूमिका साकारणार आहे. याच चित्रपटात प्रियांका त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. याचे दिग्दर्शन महेश मथाई करणार आहेत. हा चित्रपट जर प्रियांकाने साईन केला तर पहिल्यांदा दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.