Join us

आलिया भट्टचा हा अजब छंद तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 21:17 IST

करण जोहरच्या ‘स्टूडेंट आॅफ द इयर’ या सिनेमातून बॉलिवूड करिअरला सुरुवात करणारे आलिया भट्ट आणि वरुण धवन यांच्यातील जिव्हाळ्याची ...

करण जोहरच्या ‘स्टूडेंट आॅफ द इयर’ या सिनेमातून बॉलिवूड करिअरला सुरुवात करणारे आलिया भट्ट आणि वरुण धवन यांच्यातील जिव्हाळ्याची मैत्री कधीच लपून राहिली नाही. सध्या हे दोघे त्यांच्या आगामी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावत असून, एक दुसºयांचे किस्से सांगण्यात कुठलीच कसर सोडत नसताना दिसत आहेत. अशात वरुण धवनने नुकतेच आलियाच्या एका अजब छंदाचा उलगडा केला अन् उपस्थितांमध्ये एकच हसू पिकला. एका न्यूज एजंसीने दिलेल्या माहितीनुसार, आलियाला जगभरातील वेगवेगळ्या प्रकारच्या चहापत्ती गोळा करण्याचा छंद आहे. या छंदाचे भूत तिच्या डोक्यावर असे काही बसले आहे की, ती कोणत्याही देशात गेली की सर्वप्रथम चहापत्तीची चौकशी करते. आलियाच्या या अजब छंदाचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा हे दोघेही ‘मेरा सुपरस्टार सीजन-२’ या टीव्ही शोमध्ये पोहचले होते. या शोमध्ये वरुण आणि आलिया जबरदस्त एन्जॉय केला. शोच्या होस्टने वरुणला विचारले की, आलियाला जगभरातील लिपस्टिक, शूज आणि बॅग व्यतिरिक्त आणखी काय खरेदी करायला आवडेल? त्यावर वरुणने लगेचच ‘चहापत्ती’ असे उत्तर दिले. वरुणचे हे उत्तर सगळ्यांनाच आश्चर्यचकीत करणारे होते. वरुणने म्हटले की, आलिया केवळ ग्रीन-टी खरेदी करते असे नाही तर, वेगवेगळ्या प्रकारच्या चहापत्ती खरेदी करायला तिला खूप आवडते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, एकदा मी तिला भेटवस्तू म्हणून ‘व्हाइट टी’ दिली असल्याचाही वरुणने खुलासा केला. यावेळी वरुणने आलियाच्या या अजब छंदाविषयीचा एक प्रसंगही सांगितला.  वरुण म्हणाला की, जेव्हा आम्ही सिंगापूरला होतो तेव्हा आलियाची बहीण शाहीनदेखील तिथे होती. शूटिंग संपल्यानंतर आम्ही सर्वांनी बाहेर जाण्याचा प्लॅन केला होता. मात्र त्या दोघींनी स्पष्ट शब्दात नकार दिला. जेव्हा मी आलियाला याविषयी विचारले तेव्हा तिने सांगितले, आम्ही चहापत्ती खरेदी करण्यासाठी जाणार आहोत. मी विचारात पडलो की, अखेर सिंगापूरमध्ये आलियाला चहापत्ती का खरेदी करायची आहे? त्यानंतर आम्ही चहापत्तीच्या दुकानात पोहोचलो. ज्याठिकाणी विभिन्न प्रकारच्या चहापत्ती होत्या. ते बघून मी खूपच आकर्षित झालो. कारण तो अनुभव माझ्यासाठी मजेशीर होता. नुकतेच हे दोघे करण जोहर याच्या ‘कॉफी विद करण’ या चॅट शोमध्ये पोहचले होते, त्याठिकाणी दोघांनी खूप मस्ती केली. तसेच एकमेकांविषयीचे गुपितही जाहीर केले होते. आता प्रमोशननिमित्त पुन्हा या दोघांकडून त्यांची गुपितं उघड केले जात असून, त्यांच्या फॅन्ससाठी मात्र आपल्या स्टार्सच्या आवडी-निवडीची माहिती जाणून घेणे सहज शक्य होत आहे.