Join us

मस्तानी दीपिका पादुकोणचे हे रहस्य तुम्हाला माहीत आहे काय? वाचून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 16:30 IST

गेल्या १६ आॅक्टोबर रोजी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिच्या हस्ते ड्रीमगर्ल हेमामालिनी यांच्या ‘बियॉण्ड द ड्रीमगर्ल’ नावाच्या बायोग्राफीचे प्रकाशन ...

गेल्या १६ आॅक्टोबर रोजी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिच्या हस्ते ड्रीमगर्ल हेमामालिनी यांच्या ‘बियॉण्ड द ड्रीमगर्ल’ नावाच्या बायोग्राफीचे प्रकाशन करण्यात आले. कमल मुखर्जी लिखित या बायोग्राफीमध्ये अनेक खुलासे करण्यात आले आहेत. दरम्यान, या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने तिच्या आयुष्याशी निगडित अनेक खुलासे केले. शिवाय अनेक रहस्यांवरील पडदाही काढला. दीपिकाने केलेले हे खुलासे धक्का देणारे आहेत, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. होय, दीपिकाने केलेल्या एका खुलाशामुळे तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. दीपिकाने तिच्या आयुष्यातील एका रहस्याबाबतचा खुलासा करताना म्हटले की, ‘मी केवळ बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे.’ फडाफडा इंग्रजी बोलणारी दीपिका बारावीपर्यंतच शिकलेली आहे, असे म्हटले तर कदाचित कोणाचाही विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे. दीपिकाचे शिक्षण केवळ बारावीपर्यंतच झाले आहे. याबाबतचा खुलासा दीपिकानेच केला असून, मी केवळ बारावीपर्यंतच शिक्षण घेतले असल्याचे म्हटले आहे. यावेळी दीपिकाने रोमॅण्टिक रिलेशन्स कॉम्प्लिकेटेड असल्याचेही म्हटले. दीपिकाचे नाव अभिनेता रणवीर सिंग याच्याशी जोडले जाते. सध्या दोघेही ‘पद्मावती’मध्ये एकत्र काम करीत आहेत. दीपिकाने यावेळी ‘पद्मावती’बाबतही प्रतिक्रिया दिली. तिने म्हटले की, ‘पद्मावती’मध्ये काम करण्याचा कमालीचा अनुभव होता. गेल्या वर्षभरापासून आम्ही या चित्रपटाची शूटिंग करीत आहोत. मी स्वत:ला लकी समजते की, गेल्या पाच वर्षांत मी तिनदा संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम केले. भन्साळी यांचे कौतुक करताना दीपिका म्हणाली की, ‘संजय लीला भन्साळी यांना स्त्रीपात्र अधिक दमदारपणे मांडण्यासाठी ओळखले जाते. त्यामुळे त्यांच्या चित्रपटात काम करणे प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असल्याचेही दीपिकाने म्हटले. यावेळी हेमामालिनी यांनीदेखील दीपिकाचे कौतुक केले. दीपिका आजच्या युगातील ड्रीमगर्ल असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच तिचे मी सर्व चित्रपट बघितले असून, तिचा बॉलिवूडमधील आतापर्यंतचा प्रवास थक्क करणारा असल्याचेही त्यांनी सांगितले.