Join us
Daily Top 2Weekly Top 5

Asha Bhosale: अभिनेत्री श्रद्धा कपूरचं आशा भोसलेंशी होतं कौटुंबिक नातं; तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 13:55 IST

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण दिग्गज गायिका आशा भोसले यांच्याशी श्रद्धाचं कौटुंबिक नातं होतं

संगीत विश्वाची 'आशा' आज काळाच्या पडद्याआड गेलीये. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं ९३ व्या वर्षी निधन झालंय. आशा भोसलेंच्या निधनाची बातमी सर्वांसाठी धक्कादायक आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, दिग्गज गायिका आशा भोसले यांच्याशी श्रद्धाचं कौटुंबिक नातं होतं. अनेकांना ठाऊक नसेल, पण श्रद्धा कपूर ही आशा भोसले आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांची नात लागते.

कौटुंबिक संबंधश्रद्धा कपूरचे नाना (शक्ती कपूर यांचे सासरे) पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे चुलत भाऊ होते. श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांनी शिवांगी कोल्हापुरे यांच्याशी विवाह केला आहे. या नात्याने लता मंगेशकर आणि आशा भोसले या श्रद्धा कपूरच्या आजी आहेत. श्रद्धा अनेकदा आशा भोसले यांना 'आजी' म्हणून हाक मारायची आणि त्यांच्याशी तिचे खूप जवळचे नाते आहे.

श्रद्धा कपूर अनेकदा सण-समारंभात किंवा खास प्रसंगी आशा भोसले यांची भेट घेताना दिसली आहे. काही काळापूर्वी श्रद्धाने आपल्या आजीसोबतचा एक गोड फोटो शेअर करत आशा ताईंच्या साधेपणाचे आणि नव्वदी ओलांडलेल्या आशाताईंच्या एनर्जीचे कौतुक केले होते. श्रद्धाने स्वतः देखील अनेक चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे. तिच्यावर कलेचा हा वारसा मंगेशकर आणि कोल्हापुरे घराण्याकडूनच आला असल्याचे बोलले जाते.

श्रद्धा कपूरसाठी आशा भोसले केवळ एक दिग्गज कलाकार नसून त्या तिच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग होत्या. एका मुलाखतीत श्रद्धाने म्हटले होते की, आपल्या कुटुंबात अशा महान व्यक्तींचे असणे हे तिच्यासाठी खूप प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. आशा भोसले यांच्या निधनानंतर श्रद्धा कपूरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आधी लतादीदींचं जाणं आणि आज आशाताईंची प्राणज्योत मालवल्याने श्रद्धा आणि तिचं कुटुंब शोकाकुल आहे

English
हिंदी सारांश
Web Title : Asha Bhosle's familial connection with actress Shraddha Kapoor revealed.

Web Summary : Shraddha Kapoor is related to Asha Bhosle and Lata Mangeshkar; her maternal grandfather was their cousin. Bhosle's passing deeply saddened Kapoor, who often referred to her as 'grandmother'. The Mangeshkar-Kolhapure legacy inspired Shraddha's musical talent.
टॅग्स :आशा भोसलेबॉलिवूडश्रद्धा कपूरसंगीतमराठी अभिनेता