Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑन स्क्रिन रोमान्स पुन्हा नाहीच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 07:23 IST

पण, पुढे त्यांचे ब्रेक-अप झाले व ते रूपेरी पडद्यावर नंतर कधीच सोबत दिसले नाहीत. भविष्यातही त्यांचे एकत्र पुनरामगन कठीण ...

पण, पुढे त्यांचे ब्रेक-अप झाले व ते रूपेरी पडद्यावर नंतर कधीच सोबत दिसले नाहीत. भविष्यातही त्यांचे एकत्र पुनरामगन कठीण झाले आहे. नात्यांच्या चक्रव्युहात फसलेल्या अशा कलाकारांची यादी मोठी आहे. अमिताभ बच्चन व रेखा यांनी ऑन स्क्रिन रोमँटिक जोडी म्हणून अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या खाजगी संबंधांबद्दलही खूप चर्चा झाली. सिलसिला या चित्रपटानंतर मात्र त्यांचे ऑनस्क्रिन नाते संपले. मी कधीही बीग बी सोबत काम करण्यास नकार दिला नाही, असे रेखा सांगते. पण, या सर्व बोलायच्या गोष्टी आहेत असे मानले तरी देखील अमिताभ व रेखाचे ऑनस्क्रिन पुनरागमन शक्य दिसत नाही. बच्चन कुटुंबाची सून असलेली ऐश्‍वर्या रायच्या जीवनातही दोन नायकांसोबतचे नाते मीडियासाठी चर्चेचा विषय ठरले. सलमान खान व विवेक ओबेराय सोबतच्या नात्याचा अंतही दुखद झाला. आता हे संबध इतिहासजमा झाले असले तरी त्याची झळ कायम आहे. तिघेही एकमेकांचे नाव देखील घेणे पसंत करीत नाही. अशीच स्थिती जॉन अब्राहम व बिपाशा बसूच्या बाबतीत झाली. दोघेही अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी एकत्र कामही केले. आता दोघांत काहीच नाही, एकत्र काम करण्यास दोघांनीही थेट नकार दिला आहे. अक्षय कुमारचे नाव अनेक नायिकांशी जोडण्यात आले. मात्र रविना टंडन व शिल्पा शेट्टी सोबतचे त्याचे संबध विशेष म्हणावे असेच होते. पडद्यावर यश मिळवित असतानाच दोन्ही नायिकांबाबत गोष्ट लग्नापर्यंत पोहचली. मात्र ही गोष्ट गोष्टच राहिली. मात्र आता या दोन्ही नायिकांसोबत एकत्र काम करण्याची शक्यता फारच कमी दिसते. शाहिद कपूरचे नाव ज्या नायिकेशी जुळले, त्या नायिकेसोबत त्याने पुन्हा सिनेमा केलाच नाही. करिना कपूरशी तो अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होता, याच प्रकारे विद्या बालन सोबततही त्याचे नाव जोडण्यात आले. आता दोघही आपल्या संसारात व्यस्त आहेत. दोघेही एकत्र येतील का या प्रश्नावर दोन्ही नायिका हसून उत्तर देण्याचे टाळून देतात.