Join us
Daily Top 2Weekly Top 5

नात्यात उतार-चढाव नको - दीपिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 21:38 IST

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफच्या ‘ब्रेकअप’च्या बातम्या रंगत असताना दीपिका पदुकोन म्हणते,‘माझ्या आयुष्यात अशी कोणतीच परिस्थिती आली नाही की, ...

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफच्या ‘ब्रेकअप’च्या बातम्या रंगत असताना दीपिका पदुकोन म्हणते,‘माझ्या आयुष्यात अशी कोणतीच परिस्थिती आली नाही की, ज्यामुळे मला व्यक्तीसाठी लढावे लागले. खरंतर हे खुपच वैयक्तिक होईल पण मी माझ्या आयुष्यात काही वर्षांपूर्वी हारले होते पण मी त्यामुळे प्रकाशातही आले. त्यातून मला बरंच काही शिकायला मिळाले.इम्तियाज अली ज्याप्रमाणे ‘रॉकस्टार’ विषयी बोलतो तसेच माझेही झाले. पण मी त्याविषयी बोलणार नाही. या प्रवासात स्वत:चा शोध, हार्टब्रेक हे सर्वच सामावलेलं आहे. मी अनेक चित्रपटांपासून खुप काही शिकले. ज्या लोकांसोबत काम केले त्यामुळे मला माझाच शोध लागला. मी माझ्या घरच्यांच्या परवानगीने आणि संस्कारानेच स्वत:ला घडवले आणि घडवणार आहे. माझ्या पतीसोबतच मी पुढील आयुष्य घालवणार असून लिव्ह ईन रिलेशनशिपचा संबंध कुठेच येणार नाही.