Join us

भारतीय प्रेक्षकांना गृहित धरू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:56 IST

‘रांझणा’,‘तन्नू वेड्स मन्नू’,‘निल बट्टे सन्नाटा’ या चित्रपटांमध्ये सकस अभिनय केलेली स्वरा भास्कर आता लवकरच वेब सीरिज ‘इट्स नॉट दॅट ...

‘रांझणा’,‘तन्नू वेड्स मन्नू’,‘निल बट्टे सन्नाटा’ या चित्रपटांमध्ये सकस अभिनय केलेली स्वरा भास्कर आता लवकरच वेब सीरिज ‘इट्स नॉट दॅट सिंपल’ मध्ये अनैतिक संबंधांवर आधारित कथानकावर काम करणार आहे. ती म्हणते,‘भारतीय प्रेक्षकांना गृहित धरू नका. ते सध्या काहीही बघायला तयार आहेत.फ्रेश आणि काहीतरी वेगळे चित्रपट पाहणे त्यांना आवडायला लागले आहे. ते दिवसेंदिवस खुपच स्मार्ट होताना दिसत आहेत. ‘इट्स नॉट दॅट सिंपल’ या सहा भागाच्या वेब सीरिजमध्ये विवान भटेना, अक्षय ओबेरॉय आणि करणवीर मेहरा हे असतील. या शोचे कथानक लग्नाची कल्पना, नातेसंबंध आणि लग्न-प्रेम यातील महिलेची भूमिका याविषयी आहे.