Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही दिवाळी भारतीय सैन्यासाठी- जॉन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 18:49 IST

उरी येथील हल्ल्याने देशातील संपूर्ण नागरिकच काय पण सेलिब्रिटी देखील हादरून गेले आहेत. दिवाळीनिमित्त अनेकांनी वेगवेगळे संकल्प केले आहेत. ...

उरी येथील हल्ल्याने देशातील संपूर्ण नागरिकच काय पण सेलिब्रिटी देखील हादरून गेले आहेत. दिवाळीनिमित्त अनेकांनी वेगवेगळे संकल्प केले आहेत. पण जॉन अब्राहमने मात्र ही दिवाळीच शहिदांसाठी अर्पण केली आहे. याविषयी सांगतो,‘एक दिया शहिदों के नाम..दिवाली पर वीरता को सलाम, शहिदों का दिया...’ उरी हल्ला, सर्जिकल स्ट्राईक या सर्व घटनांसाठी भारतीय सैन्याला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. भारतीय सैन्याचे आभार मानताना जॉन म्हणतो,‘ भारतीय सैन्याला मी खरा हिरो मानतो. दिवाळी सारख्या सणांवेळी आपण घरांमध्ये कुटुंबियांसमवेत हा सण साजरा करत असतो. त्यावेळी सीमेवर भारतीय सैन्य जीवाचे रान करून लढत असतात. आपल्याप्रमाणे त्यांनाही वाटते की, आपण घरच्यांसोबत सण साजरा करावा. पण त्यांना शक्य होत नाही. राष्ट्राचे संरक्षण हाच त्यांच्यासाठी खरा सण असतो. म्हणून सैनिकांनो तुमच्या कर्तव्यपूर्तीला आणि क्षमतेला सलाम. जय हिंद, जय हिंद की सेना!!’