Join us
Daily Top 2Weekly Top 5

पार्टीमध्ये मर्यादेपेक्षा अधिक डीपनेक ब्लाऊज घालून आली प्रसिद्ध उद्योगपतीची पत्नी, पाहणारे झाले अवाक् 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 17:30 IST

Divya Khosla Kumar: सेलेब्स नेहमी पार्टी आणि इव्हेंटमध्ये बोल्ड ड्रेस परिधान करून जात असतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या लूकची चर्चा होते.

सेलेब्स नेहमी पार्टी आणि इव्हेंटमध्ये बोल्ड ड्रेस परिधान करून जात असतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या लूकची चर्चा होते. गेल्यावर्षी दिवाळीत प्रसिद्ध निर्माता आणि अभिनेते कृष्ण कुमार यांनी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये प्रसिद्ध उद्योगपतीची पत्नी दिव्या खोसला कुमार एवढ्या हॉट लूकमध्ये पोहोचली होती की तिला पाहून तिचे फॅन्स अवाक् झाले होते. तिने लाँग स्कर्ट्ससोबत डीपनेक ब्लाऊज परिधान केला होता. 

दिव्या खोसला कुमार बिझनेसमन भूषण कुमारची पत्नी आहे. भूषण कुमार टी सिरीज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तर दिव्या खोसला केवळ अभिनेत्रीच नाही तर गायिका आणि निर्माताही आहे. कृष्ण कुमार यांच्या गेल्या दिवाळीतील पार्टीमध्ये दिव्या खोसला सिल्व्हर रंगाच्या स्कर्टसोबत ग्रे कलरच्या रिविलिंग ब्राऊज परिधान करून आली होती. दिव्याचा हा ब्लाऊज केवळ डिपनेक नव्हता तर बॅकसाइडने पारदर्शकही होता.  दिव्याने हा डीपनेक ब्लाऊज घालून पार्टीमध्ये एंट्री केल्यावर प्रत्येकजण तिच्या या लूककडे पाहतच राहिला. तिचा हा ब्लाऊज प्रमाणापेक्षा अधिकच डीप होता. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने केसांचा बन बनवला होता. तसेच लाइट मेकअप केला होता.

दिव्या खोसला कुमार गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे बोल्ड ड्रेस परिधान करून कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहे. एवढंच नाही तर ती सातत्याने सोशल मीडियावर रिविलिंग कपड्यांमध्ये बोल्ड फोटो सातत्याने शेअर करत आहे. या फोटोंमध्ये दिव्या अत्यंत हॉट पोझ देत आहे.  

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूड