Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्या ऐवजी केसांवर मास्क लावलेल्या महिलेला पाहून हैराण झाली दिव्या दत्ता, दिली ही रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 13:14 IST

अभिनेत्री दिव्या दत्ताने ट्विटरवर एका महिलेचा फोटो शेअर केला आहे, जो पाहून सर्व हैराण झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ताने नुकतेच सोशल मीडियावर एक हैराण करणारा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या फोटोवर नेटकरी खूप प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोत एका महिलेने चेहऱ्यावर मास्क लावण्याऐवजी केसांवर मास्क लावला आहे. या महिलेला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

दिव्या दत्ताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले की, देव जाणो आणखी काय काय पाहावे लागेल. देशभरात कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढत चालले आहे. केंद्र आणि राज्य सरकार लोकांना काळजी घ्यायला घेत सांगत आहेत. अशात या महिलेचा बेजबाबदारपणा स्पष्ट दिसतो आहे.काही महिला युजर्स या महिलेचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होतो आहे.

दिव्या दत्ताच्या पोस्टवर लोक खूप प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, ती महिला आहे, ती काहीही करू शकते. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, चेहऱ्याचा योग्य उपयोग करत आपल्या देशाची ही महान महिला आहे. हेच सौंदर्य आहे आपल्या भारत देशाची आणि आपल्या देशात पावलापावलावर विविधता पहायला मिळत आहे. एका युजरने महिलेचे कौतुक करत म्हटले की, धन्य आहे भारतीय नारी. हा फोटो आतापर्यंत शेकडो लोकांनी शेअर केले आहे. तसेच यावर खूप मीम्स व्हायरल होत आहेत. 

टॅग्स :दिव्या दत्ताकोरोना वायरस बातम्या