Join us
Daily Top 2Weekly Top 5

सतत चर्चेत असणारी स्वरा अभिनेत्यासोबत नाही तर बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत करणार रोमांस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 06:00 IST

सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

एक लडकी को देखा तो ऐसा लगा चित्रपटानंतर आता पुन्हा एकदा शीर कोरमा चित्रपटात समलैंगिक प्रेम दाखवले जाणार आहे.शीर कोरमामध्ये स्वरा भास्कर व दिव्या दत्ता रोमांस करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराज आरिफ अन्सारी यांनी केले आहे. या चित्रपटात स्वरा व दिव्या यांच्याव्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी मुख्य महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

शीर कोरमा सिनेमात अशा महिलेची कथा रेखाटण्यात आली आहे ज्यात ती कुटुंबातील नाती, स्वतःची ओळख व मान्यता या भावनाचा शोध घेते आहे. या चित्रपटाबद्दल फराज यांनी सांगितलं की, दिव्या व स्वरा बॉलिवूडमधील प्रतिष्ठीत नाव आहे आणि LGBTQIA व समुदायाला त्यांचा सहयोग आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी त्यांची निवड करण्याचा निर्णय सोप्पा गेला. खरेतर जेव्हा मी चित्रपटाची कथा लिहिली तेव्हा माझ्या डोक्यात दिव्या आधीपासून तिचे पात्र साकारताना दिसत होती. 

दिव्या दत्ताने सांगितलं की, मी आधीदेखील फराजसोबत काम केले आहे आणि मला माहित आहे की तो मला कोणत्या भूमिकेसाठी विचारतो आहे. माझ्यासाठी हा फक्त चित्रपट नाही. एक महिला जिचे कुटुंब, तिचा पार्टनरसोबतच्या नात्याची कथा रेखाटण्यात आली आहे. समाजातील विचारांबद्दल बोलण्याची गरज आहे.

दिव्यानं पुढे सांगितलं की, मी एक कलाकार म्हणून चॅलेंज देण्यासाठी या भूमिकेला होकार दिला आहे आणि दुसरी बाजूदेखील मला जाणून घ्यायची होती.

माझ्यासोबत स्वरा व सुरेखा यांच्यासारख्या सहकलाकार आहेत ज्या खूप कमाल आहेत. मला नेहमीच त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची इच्छा होती. हा चित्रपट त्या महिलांसाठी खास आहे जे यात सहभागी आहेत आणि समाजात बदल आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :स्वरा भास्कर