Join us

छत्तीसगढच्या वितरकाला मिळाले ‘रईस’च्या प्रदर्शनाचा विरोध करणारे शिवसेनेचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 20:33 IST

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचा आगामी बहुप्रतिक्षित ‘रईस’ हा चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री असल्याने मनसेने विरोध केला होता. आता आणखी ...

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचा आगामी बहुप्रतिक्षित ‘रईस’ हा चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री असल्याने मनसेने विरोध केला होता. आता आणखी एक  अडचण ‘रईस’च्या प्रदर्शनात अडथळा निर्माण करू शकेल असे दिसते आहे. छतीसगढ मधील एका चित्रपट वितरकाला शिवसेनेने ‘रईस’ची प्रदर्शन करून नये अशा आशयाच्या धमकीचे पत्र मिळाले असल्याचा दावा केला आहे. शाहरुखच्या या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिचीदेखील प्रमुख भूमिका आहे. राहुल ढोलकीय दिग्दर्शित ‘रईस’ या चित्रपटाचे प्रदर्शन 25 जानेवारीला करण्यात येणार आहे. मुंबई येथील वितरक अक्षय राठी यांनी आपल्या ट्विटरहून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे व छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमन सिंग यांना टॅग करीत या धमकीच्या पत्राचा एक फोटो शेअर केला आहे. हे पत्र हिंदी भाषेत लिहले आहे. अक्षय राठी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलेय, ‘आदित्य आम्हाला तुमच्या पार्टीच्या छत्तीसगढ शाखेकडून शाहरुख खान याची भूमिका असणारा ‘रईस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा विरोध करणारे धमकीचे पत्र मिळाले आहे’. यानंतर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री रमन सिंग यांचा उल्लेख करून लिहलेय, ‘रमन आणि अभिषेक सिंग यांनी यात लक्ष घालावे, यामुळे छत्तीसगढमध्ये न्याय व्यवस्था मजबूत व्हावी’राठी यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकण्यासाठी शाहरुखच्या प्रशंसकांची मदत घेतली आहे. त्याने लिहलेय, ‘मी शाहरुखच्या सर्व चाहत्यांना विनंती करतो की, हे प्रकरण आदित्यपर्यंत पोहचविण्यासाठी मदत करावी, मला विश्वास आहे की ते या मुर्खपणाच्या विरोधात कार्यवाही करतील. या ट्विटनंतर शिवसेनेकडून काय कार्यवाही होते लवकरच कळेल पण शाहरुखच्या ‘रईस’ समोर केवळ हृतिकचा काबिलच नव्हे तर आणखी अडचणी आहेत हे यावरून दिसते.