Join us

अमेरिकेच्या 'हाऊस ऑफ फिल्म'द्वारे होणार 'मिलियन डॉलर नोमॅड' चित्रपटाचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 13:38 IST

'मिलियन डॉलर नोमॅड' चित्रपटाची कथा आपल्याला चार वेगवेगळ्या देशांमध्ये उलगडताना दिसून येते

ठळक मुद्दे'मिलियन डॉलर नोमॅड' चित्रपटात एका काश्मीरी मेंढपाळाची कथा 'मिलियन डॉलर नोमॅड' इंग्लिश आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म

दिग्दर्शक-निर्माते राहत काझमी नेहमीच आपल्या उत्तोमोत्तम चित्रपटांच्या दिग्दर्शन व  निर्मितीमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आले आहेत. 'मंटोस्तान', 'आयडेंटिटी कार्ड', 'लीहाफ' यांसारख्या एका पेक्षा एक सरस चित्रपटांनंतर आता त्यांचा आणखीन एक चित्रपट येतो आहे. त्याचे नाव आहे 'मिलियन डॉलर नोमॅड'. ही इंग्लिश आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म असून निर्मिती 'हाऊस ऑफ फिल्म' या नऊ अकादमी पुरस्कार विजेत्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अव्वल अमेरिकन डिस्ट्रीब्यूशन आणि सेल्स कंपनीपैकी एका कंपनीच्या सहाय्याने होणार आहे. 

'मिलियन डॉलर नोमॅड' चित्रपटाची कथा आपल्याला चार वेगवेगळ्या देशांमध्ये उलगडत असताना दिसून येते. 'मिलियन डॉलर नोमॅड' ही एका काश्मीरी मेंढपाळाची कथा असून एक दिवस अचानक तो स्वतःला परदेशात लोकप्रिय असल्याचे पाहतो. या चित्रपटात शोएब निकाश शाह, स्पेन मधील अभिनेत्री मेरीटचेल ओर्टेगा, फ्रान्स मधील कॅनल ओप्पे तर भारतातील तारिक खान, जितेश कुमार आणि मुजीब उल हसन फ्रान्सचे पॅट्रिक फेमिओ ऑस्ट्रेलियाचे अॅथेंट गॅविन सारख्या कलाकारांचा समावेश आहे. 

'मिलियन डॉलर नोमॅड' चित्रपट सर्व फेस्टिवल तसेच चित्रपट बाजारपेठांमध्ये जाण्यास तयार झालेला आहे. याबद्दल सांगताना राहत काझमी म्हणतात की, "यावेळी आम्ही जागतिक प्रेक्षकांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. या चित्रपटाद्वारे आम्ही प्रायोगिक सिनेमा हाताळण्याचा प्रयत्न करीत आहोत, हा अशा प्रकारचा चित्रपट आहे जो केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करीत नाहीत तर विविध संस्कृतींना एकत्र आणतो, अशा वेळी विविध प्रश्नांवर प्रकाश टाकणे आवश्यक आहे."

'मिलियन डॉलर नोमॅड' चित्रपटाची निर्मिती राहत काझमी फिल्म्स, तारिक खान प्रॉडक्शन, झेबा साजिद फिल्म्स, बेंचमार्क पिक्चर्स आणि इंडियन फिल्म स्टुडीओद्वारे तर सह-निर्मिती मीडियामार्क इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे होत आहे.