Join us
Daily Top 2Weekly Top 5

असमाधानी पीसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 17:56 IST

व्यक्तीला यश मिळत गेले की त्याची हाव अजून वाढतच जाते. समाधान ही बाब व्यक्तीमत्त्वातून नाहिशी होऊ लागते. अशीच काहीशी ...

व्यक्तीला यश मिळत गेले की त्याची हाव अजून वाढतच जाते. समाधान ही बाब व्यक्तीमत्त्वातून नाहिशी होऊ लागते. अशीच काहीशी परिस्थिती ग्लोबल फेम मिळवलेल्या प्रियांका चोप्रा हिच्याबाबतीत निर्माण झाल्याचे कळतेय. तुम्हाला वाटेल असे झाले तरी काय? होय. ‘देसी गर्ल’ पीसीला केवळ एका देशातच किर्ती संपादन करायचीय असे नव्हे तर संपूर्ण जगात तिला स्वत:चे नाव कमवायचे आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येच नव्हे तर इतर देशांमधील मनोरंजन जगतात तिला प्रसिद्धी मिळवायची आहे. अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या  सीजनमध्ये बिझी असलेली प्रियांका चोप्रा त्यासोबतच ‘बेवॉच’च्याही प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे. केवळ बॉलिवूडमधील यशाबद्दल तिचे समाधान होत नाही तर तिला संपूर्ण जगाकडून कौतुकाची अपेक्षा आहे. याविषयी बोलताना ती म्हणते,‘मी माझा देश, माझे कुटुंब, मित्र सर्व सोडून परदेशात आले. त्यांनी मला दिलेल्या संधीचा आणि स्वातंत्र्याचा जर मला योग्य वापर करता आला नाही तर त्याचा काय उपयोग आहे? टीव्ही जगतात काम करून मला सतत चाहत्यांसोबत राहता येते. त्यामुळे मी अमेरिकन टीव्ही शोचा पर्याय निवडला. माझ्यातला कलाकार मला शांत बसू देत नाही, हेच खरंय.’