Join us

वाद संपला: भन्साळी प्रॉडक्शनने घेतली करणी सेनेच्या प्रतिनिधींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 15:33 IST

‘पद्मावती’ चित्रपटाबाबत झालेल्या वादानंतर भन्साळी प्रॉडक्शनने पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. यात राजपूत करणी सेनेबरोबर असणारे विवाद संपुष्टात आल्याचे म्हटले ...

‘पद्मावती’ चित्रपटाबाबत झालेल्या वादानंतर भन्साळी प्रॉडक्शनने पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. यात राजपूत करणी सेनेबरोबर असणारे विवाद संपुष्टात आल्याचे म्हटले आहे.संजय लीला भन्साली यांच्या भन्साळी प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या सीईओ शोभा संत आणि सहायक निर्माते चेतन देवळेकर यांच्यासह एका शिष्टमंडळाने जयपूर येथील राजपूत सभेच्या प्रतिनिधींची भेट घेतली. त्यानंतर या संदर्भातील वाद संपुष्टात आल्याचे प्रॉडक्शन हाऊसच्यावतीने सांगण्यात आले.भन्साळी प्रॉडक्शनच्या अनुसार चित्रपटाच्या ज्या मुद्द्यावरून वाद होता, तो मुद्दा स्पष्ट करण्यात आला. राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्या दरम्यान कोणतेही रोमँटिक दृष्य, गाणे अथवा कल्पनेतील दृष्य नाही, असे प्रॉडक्शनने स्पष्ट केले.चुकीचा इतिहास दर्शविण्यात येत असल्याबद्दल राजपूत करणी सेनेने जयपूर येथील राजगढ येथे सुरू असलेल्या ‘पद्मावती’ंच्या शूटिंग सेटवर जात संजय लीला भन्साळी यांना मारहाण केली होती. त्यानंतर या चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले होते.दरम्यान बॉलिवूडमधील अनेक नामवंतांनी एकत्र येऊन संजय लीला भन्साळी यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला होता. जावेद अख्तर, करण जोहर, हृतिक रोशन, प्रियंका चोप्रा, ऋषी कपूर, हुमा कुरेशी, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, सुशांत सिंग राजपूत यांनी संजय लीला भन्साळी यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान या वादाला राजकीय वळणही लागले होते. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही यात उडी घेत राणी पद्मावती हिंदू असल्याने हा चित्रपट चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात येत असल्याचे म्हटले होते. पद्मावती या चित्रपटात रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि शाहीद कपूर हे  मुख्य भूमिकेत आहेत.प्रतिनिधींची