Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PICS : दिशा पटनीची बहीण आहे तिच्याइतकीच सुंदर, भारतीय सैन्यात आहे अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 08:00 IST

‘एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दिशा पटानी हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. पण आज आम्ही दिशाबद्दल नाही तर तिच्या बहिणीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

ठळक मुद्देदिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास सध्या चित्रपट ‘मलंग’ च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.

‘एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दिशा पटानी हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. पण आज आम्ही दिशाबद्दल नाही तर तिच्या बहिणीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. दिशाची बहीण दिशाइतकीच सुंदर आहे. दिशाला एक मोठी बहीण आहे जिचे नाव खुशबू पटानी आहे. दिशाची बहीण खुशबू ही भारतीय सैन्यात अधिकारी आहे.

 खुशबू ही दिशाची मोठी बहीण आहे. तिच्या पाठी दिशा आणि नंतर त्यांचा छोटा भाऊ सुर्यांश पटानी. अलीकडे  दिशाने तिची बहीण खुशबूबद्दन पोस्ट केली होती. त्या फोटोमध्ये खुशबूने भारतीय लष्कराचा पोशाख घातला आहे. 

दिशाने बॉलिवूडचे ग्लॅमरस क्षेत्र करिअर म्हणून निवडले. तर खुशबूने लष्करी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. खुशबू व दिशा अगदी एकमेकींसारख्या दिसतात. पण दोघींच्या स्वभावात मात्र प्रचंड अंतर आहे.

होय, दिशा स्वभावाने एकदम बिनधास्त आहे. याऊलट तिची बहीण तिच्यापेक्षा खूप वेगळी आहे. खुशबूचा स्वभाव शांत आणि गंभीर आहे. एवढ्या प्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण असूनही ती मीडियापासून लांब राहणे पसंत करते.  

साध्या सामान्य मुलीसारखे जगणे तिला आवडते. खुशबू आईच्या जवळ आहे तर दिशा बाबांच्या. दिशा प्रत्येक गोष्ट तिच्या बाबांशी शेअर करते.  दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास सध्या चित्रपट ‘मलंग’ च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. हा एक रोमँटिक हॉरर चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :दिशा पाटनी