'बागी २' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दिशा पटानीने आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे रसिकांच्या नजरा तिच्यावर खिळवून ठेवल्या आहेत. दिशा पटानी नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. ती व टायगर रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जाते. त्यामुळे ते दोघे एकत्र स्पॉट झाले की त्यांच्या चर्चांना उधाण येते. पण आता मात्र दिशाचे एक्स बॉयफ्रेंडसोबत काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
दिशा पटानी एकेकाळी प्रसिद्ध टिव्ही अभिनेता पार्थ समथानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सध्या पार्थ एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये अनुरागची भूमिका साकारत आहे.
दिशा तिच्या मॉडेलिंगच्या काळात जवळपास 1 वर्ष पार्थला डेट करत होती. पण अचानक या दोघांचं ब्रेकअप झालं. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. मीडिया रिपोर्टनुसार पार्थ दिशाला चिट करत होता आणि याबाबत दिशाला समजल्यावर तिनं पार्थ पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण या दोघांनीही याबाबत बोलणं टाळलं.