Join us
Daily Top 2Weekly Top 5

हेलन यांच्याकडून प्रेरणा घेत तयार झाला दिशाचा स्लो मोशन लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 14:46 IST

अली अब्बसा जफर दिग्दर्शित भारत सिनेमातले स्लो मोशन  गाणं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यातील सलमान खान आणि दिशा पटानीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

ठळक मुद्देसिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अली अब्बास जाफरने सांभाळली आहेसलमान खान आणि दिशा पटानीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे

अली अब्बसा जफर दिग्दर्शित भारत सिनेमातले स्लो मोशन  गाणं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यातील सलमान खान आणि दिशा पटानीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या गाण्यासाठी सलमानने दिशा नो किसिंग क्लॉजदेखील तोडला आहे.  दिशाचा या गाण्यातील लूक हेलन यांच्याकडून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आला आहे.  दिशाला तिचा या गाण्यातील लूक चांगलाच पसंतीस पडला आहे. यासाठी दिशाने लुक को डिझानयरचे देखील धन्यवाद दिले आहेत.  

 भारतमध्ये सलमान खान, दिशासह कतरीना कैफ, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर आणि तब्बू अशी कलाकारांची तगडी फौज आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अली अब्बास जाफरने सांभाळली आहे.  भारत सिनेमात अॅक्शन, रोमान्स आणि देशभक्ती पाहायला मिळणार आहे आणि चार टप्प्यात या सिनेमाची कथा उलगडण्यात येणार आहे.

हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड ऑडियन्सपर्यंत मर्यादित ठेवायचा नसल्यामुळे या चित्रपटाला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतची कथा सलमानच्या भारत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. भारतच्या पूर्वजांनी कुठल्या प्रकारच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते आणि आजचा भारत कसा आहे,अशी या चित्रपटाची ढोबळ कथा आहे. ईदच्या मुहूर्तावर येत्या ५ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :दिशा पाटनीसलमान खानभारत सिनेमा