Join us
Daily Top 2Weekly Top 5

 दिशा पाटनीचे फोटो पाहून युजर्सची सटकली, चक्क आमिर खानशी तुलना केली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 08:00 IST

दिशा पाटनीने स्वत:चे काही ग्लॅमरस फोटो शेअर केलेत आणि या फोटोंवरून बया ट्रोल झाली. ट्रोलही अशी की, काही युजर्सनी तिची तुलना थेट आमिर खानशी केली.

ठळक मुद्देदिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती सलमानसोबत दिसणार आहे. ती सध्या ‘राधे: यूवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात व्यग्र आहे.

सोशल मीडियावर तुम्ही कधी ट्रोल व्हा याचा नेम नाही. आता हेच बघा ना, दिशा पाटनीने स्वत:चे काही ग्लॅमरस फोटो शेअर केलेत आणि या फोटोंवरून बया ट्रोल झाली. ट्रोलही अशी की, काही युजर्सनी तिची तुलना थेट आमिर खानशी केली. अनेकांनी तर तिच्या फोटोंवर अशा काही मजेदार कमेंट्स दिल्या की, वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही.

तर दिशाने ट्विटरवर दोन फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये दिशा अ‍ॅनिमल प्रिंटच्या ड्रेसमध्ये दिसतेय. ड्रेस भारी आहे, दिशाच्या अदाही भारी आहेत. पण दिशाच्या चेह-यावरचे एक्सप्रेशन मात्र युजर्सला आवडले नाहीत. मग काय, याचवरून ती ट्रोल झाली.

एका युजरने आमिर खानचा स्त्री वेशातील फोटो शेअर, तुझ्यापेक्षा ही सुंदर दिसतेय, अशी कमेंट करत दिशाची खिल्ली उडवली. एका युजरने तिच्या चेह-यावरचे भाव पाहून तिला ट्रोल केले.

‘अरे असे कसे शूट केले. जणू तुझ्याकडून कुणी बळजबरीने शूट करून घेतेय...,’ असे या युजरने लिहिले. एका युजरने तर दिशाला थेट सवालच केला. ‘प्रत्येक फोटोत तू इतकी तणावात आणि घाबरलेली का दिसतेस? थोडे हसत जा,’ असे या युजरने लिहिले. 

एकंदर काय तर दोन फोटोंनी दिशाचीच नाही तर तिच्या चाहत्यांचीही चांगलीच निराशा केली. आता यातून दिशा काय धडा घेते, ते बघूच.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती सलमानसोबत दिसणार आहे. ती सध्या ‘राधे: यूवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात व्यग्र आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय  नागिन आणि रणबीर कपूरसोबत लव रंजन दिग्दर्शित एका  चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे.

टॅग्स :दिशा पाटनी