Join us
Daily Top 2Weekly Top 5

डोक्याला मार लागल्याने ६ महिने गेली होती स्मृती, या हॉट अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 15:22 IST

फिटनेसप्रेमींसाठी ही अभिनेत्री एक प्रेरणा आहे. पण असाच एक स्टंट तिच्या जीवावर बेतला होता, हे तुम्हाला ठाऊक नसेल.

ठळक मुद्देसध्या दिशा ‘मलंग’ या चित्रपटात बिझी आहे. मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटात दिशासोबत आदित्य राय कपूर, अनिल कपूर व कुणाल खेमू लीड भूमिकेत आहेत.

दिशा पाटनी ही तिच्या अ‍ॅक्टिंगसोबत फिटनेस आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते. दिशाच्या इंटेंस वर्कआऊटचे रोज नवे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यामुळेच फिटनेसप्रेमींसाठी दिशा एक प्रेरणा आहे. पण असाच एक स्टंट दिशाच्या जीवावर बेतला होता, हे तुम्हाला ठाऊक नसेल. होय, या कठीण स्टंटची प्रॅक्टिस करताना दिशाच्या डोक्याला जबर इजा झाली होती. यानंतर सहा महिने दिशाला काहीही आठवत नव्हते. म्हणजेच तिला स्मृतिभ्रंश झाला होता.

अलीकडे खुद्द दिशाने एका मुलाखतीत या घटनेबद्दल सांगितले. एकदा दगडी लादीवर जिमनास्टिकचे ट्रेनिंग करताना माझ्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती. ही जखम इतकी गंभीर होती की, सहा महिने मला स्मृतिभ्रंश झाला होता. या सहा महिन्यांत मी माझे आयुष्य गमावून बसले होते. कारण मला काहीही आठवत नव्हते, असे दिशाने सांगितले.

शूटींग नसले की आठवड्यात वेगवेगळ्या दिवशी मी जिमनास्टिक आणि मिक्स मार्शल आर्टची प्रॅक्टिस करते. यादरम्यान दुखापत होणे नवी गोष्ट नाही.   पण आज मी जिथे कुठे आहे, ते याचमुळे, असेही ती म्हणाली.

दिशाने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या जीवनावर आधारित होता. यानंतर दिशाने मागे वळून पाहिले नाही.

सध्या दिशा ‘मलंग’ या चित्रपटात बिझी आहे. मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटात दिशासोबत आदित्य राय कपूर, अनिल कपूर व कुणाल खेमू लीड भूमिकेत आहेत. 2020 मध्ये व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

टॅग्स :दिशा पाटनी