Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: ‘या’ गोष्टीत दिशा पाटनीला येते अधिक मजा... तुम्हीही म्हणाल OMG!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 08:00 IST

दिशाचा खुलासा...

ठळक मुद्दे दिशा आणि आदित्य यांची प्रमुख भुमिका असलेला मलंग हा सिनेमा 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.

बॉलिवूड बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणा-या दिशा पाटनीचा ‘मलंग’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात दिशा कधी नव्हे इतक्या बोल्ड रूपात दिसणार आहे. साहजिकच ट्रेलर आणि पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या दिशा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच प्रमोशनचा भाग म्हणून तिने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत दिशाने एक मोठा खुलासा केला आहे. होय, कुठल्या गोष्टीत तिला अधिक मजा येते, हे तिने यात सांगितले. होय, ‘चाय पिना मेरा मजा है’, असे दिशा या व्हिडीओत सांगतेय.

हा व्हिडीओ शेअर करताना दिशाने लोकांकडून व्हिडीओ मागितले होते. तुमच्यासाठी नशा आणि मजा असलेल्या गोष्टी सांगा अन् व्हिडीओ शेअर करा, असे आवाहन तिने केले होते. यातील सर्वाधिक मजेदार व्हिडीओ आपल्या पेजवर पोस्ट करण्याचे वचनही तिने दिले होते. 

दिशाच्या या व्हिडीओ चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत. काहींनी यावरून तिला ट्रोलही केले आहे. ‘अगर कप में चाय होती तो और मजा आजाता दिशाजी,’ अशा शब्दांत एका युजरने तिची फिरकी घेतली आहे. तर एकाने ‘अब इतनाही रह गया था,’ अशी कमेंट करत तिला ट्रोल केले आहे.

 दिशा पाटनी आणि आदित्य यांची प्रमुख भुमिका असलेला मलंग हा सिनेमा 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना दिशा आणि आदित्यचा रोमांस पाहिला मिळणार आहे. ‘मलंग’ हातावेगळा करताच दिशा ‘राधे’ या सिनेमाचे शूटींग सुरु करणार आहे. यात ती पुन्हा एकदा सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. याआधी तिने सलमानसोबत ‘भारत’ चित्रपटामध्ये काम केले होते. मात्र भारत हा चित्रपट बाक्स आॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण ‘राधे’ या चित्रपटाबद्दल मात्र प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. 

टॅग्स :दिशा पाटनी