Join us
Daily Top 2Weekly Top 5

... आणि दिशा पटानीने केले प्रिया प्रकाशला कॉपी, पाहा हा पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 15:13 IST

दिशा पटानीने नुकत्याच एका कॉफीच्या ब्रँडसाठी चित्रीकरण केले. या जाहिरातीत ती प्रिया प्रकाशसारखी ‘नैन मटक्का’ करताना दिसणार आहे. एवढेच नव्हे तर या जाहिरातीत ती प्रियासारखेच कपडे घालणार आहे आणि प्रियासारखीच हेअर स्टाइल देखील करणार आहे.

काही महिन्यांपूर्वी एक मुलगी एका रात्रीत स्टार झाली. काही सेंकंदाच्या व्हिडिओने तिला रातोरात स्टार बनवले. तिच्या ‘नैन मटक्का’ने अनेकांना वेड लावले. आम्ही कुणाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. होय, आम्ही बोलतोय ते आपल्या ‘विंक स्टाईल’साठी ओळखली जाणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिच्याबद्दल. इंटरनेट सेन्सेशन मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर ही लाखो हृदयांवर राज्य करते. तिचे लाखो चाहते तिच्या एका लूकसाठी आतूर असतात. सामान्य व्यक्तीच नव्हे तर बॉलिवूडमधील मंडळी देखील तिच्या अंदाचे फॅन्स झाले आहेत असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

दिशा पटानीने नुकत्याच एका कॉफीच्या ब्रँडसाठी चित्रीकरण केले. या जाहिरातीत ती प्रिया प्रकाशसारखी ‘नैन मटक्का’ करताना दिसणार आहे. एवढेच नव्हे तर या जाहिरातीत ती प्रियासारखेच कपडे घालणार आहे आणि प्रियासारखीच हेअर स्टाइल देखील करणार आहे. शाळेच्या ड्रेसमधील प्रियाचा हा अंदाज लोकांना प्रचंड भावला होता. प्रियानंतर आता दिशाचा हा अंदाज देखील प्रेक्षकांना आवडेल अशी सगळ्यांना खात्री आहे. या जाहिरातीच्या चित्रीकरणाच्या वेळेचे काही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत असून या फोटोमध्ये दिशा खूपच छान दिसत आहे. दिशाने प्रियाची तंतोतंत कॉपी केली असली तरी तिचा हा अंदाज देखील मनाला नक्कीच भावत आहे. 

ओरू अडार लव या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या एका क्लिपने प्रिया प्रकाशला एका रात्रीत स्टार बनवले. ही क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली की, एकाच दिवसांत प्रियाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सहा लाखांवर पोहोचली. या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब् बनवले. या व्हिडिओत प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’ रोमान्स करताना दिसली होती. प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे. डान्स आणि भटकंती हे तिचे आवडते छंद आहेत. बी कॉम फर्स्ट ईअरची विद्याथीर्नी असलेली प्रिया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते.

टॅग्स :दिशा पाटनी