Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये दिशा पटानीने शेअर केला हॉट फोटो, सोशल मीडियावर झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 19:05 IST

दिशा या फोटोत खूपच बोल्ड आणि हॉट दिसतेय.

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. सेलिब्रेटी घरात राहून आपला वेळ व्यतित करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते फॅन्सच्या संपर्कात आहेत. अभिनेत्री दिशा पटानीने देखील सोशल मीडियावर तिचा थ्रो बॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिशाने, 'ते दिवस होते' असे कॅप्शन दिले आहे. दिशा या फोटोत खूपच बोल्ड आणि हॉट दिसतेय. तिने शेअर केलेला फोटो पाहून तिचे चाहते संमिश्र प्रतिक्रीया देत आहेत. काहींनी तिच्या या फोटोला लाईक्स केले आहे तर काही यूर्जसनी दिशाला चांगलेच ट्रोल केले आहे. 

सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर भिनेत्रींप्रमाणे दिशाचा बोलबाला असतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कधी बिकनी तर कधी टॉपलेस अशा अंदाजात ती फोटोशूट करत सा-यांची पसंती मिळवत असते. आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते.  दिशाच्या इंटेंस वर्कआऊटचे रोज नवे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. 

दिशाचा काही महिन्यांपूर्वी मलंग सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमात दिशासोबत आदित्य कपूर रॉय, अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्या मुख्य भूमिका होत्या. 

 

टॅग्स :दिशा पाटनी