Join us

टायगर श्रॉफची प्रेयसी दिशा पटानी दिसली या राजकीय नेत्यासोबत, सोशल मीडियावर झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 16:30 IST

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून ऐकायला मिळत आहे.

ठळक मुद्देटायगर श्रॉफची प्रेयसी दिशा पटानी नुकतीच मुंबईत एका राजकीय नेत्यासोबत दिसली. शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत तिला एका हॉटेलच्या बाहेर पाहाण्यात आलं. याआधी देखील काही महिन्यांपूर्वी ते दोघे एकत्र दिसले होते.

'एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून दिशा पटानीने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्याआधी 'लोफर' या तेलुगू सिनेमातून दिशाने अभिनयाची इनिंग सुरू केली होती. धोनी या चित्रपटातील तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली आणि त्यानंतर जॅकी चॅनसह 'कूंग फू योगा' या सिनेमातही दिशाने काम केलं होतं. 'बागी-२' या सिनेमातही दिशाच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळाली होती. 'बागी-२' मध्ये दिशा आणि टायगर श्रॉफची जोडी रसिकांना प्रचंड भावली होती. 

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून ऐकायला मिळत आहे. दिशा आणि टायगर कधी लंच डेटवर जातात तर कधी पार्टींमध्ये एकत्र दिसतात. दिशाच्या भारत या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या प्रिमियरला देखील टायगर आणि दिशा एकत्र दिसले होते. पण दिशाने नेहमीच त्यांच्या नात्याबाबत मौन राखणेच पसंत केले आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान टायगरने त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला होता. तो म्हणाला होता की, सेलिब्रेटींच्या आयुष्याची चर्चा नेहमीच सगळीकडे सुरू असते. त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायची इच्छा सगळ्यांना असते हे मला माहिती आहे. त्यामुळे दिशा आणि माझ्याकडे लोकांचे जास्तच लक्ष असते. आम्ही दोघे एकत्र खूप धमाल मस्ती करतो आणि एकमेकांची कंपनी एन्जॉय करतो. त्यामुळे या सगळ्या चर्चेचा आमच्या मैत्रीवर कधीही परिणाम होत नाही. 

टायगर श्रॉफची प्रेयसी दिशा पटानी नुकतीच मुंबईत एका राजकीय नेत्यासोबत दिसली. शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत तिला एका हॉटेलच्या बाहेर पाहाण्यात आलं. याआधी देखील काही महिन्यांपूर्वी ते दोघे एकत्र दिसले होते.

दिशा आणि आदित्य यांना एकत्र पाहाताच त्यांच्या मैत्रीची चर्चा रंगली आहे. तसेच त्यांच्या या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावरील हे फोटो पाहून दिशाला तिचे चाहते टायगरवरून प्रश्न विचारत आहेत. 

‘टायगर जिंदा है’ असं एका नेटिझनने कमेंटमध्ये म्हटले आहे तर काहींनी ‘टायगर कहाँ है’, असा प्रश्न दिशाला विचारला आहे. तर ‘अब टायगर का क्या होगा, ‘अब फिर एक बार टाइगर के पैर में चोट लगने वाली है,’ असं म्हणत दिशाला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. 

टॅग्स :दिशा पाटनीटायगर श्रॉफआदित्य ठाकरे