Join us

मलायका, कतरिनाला मागे टाकत ही अभिनेत्री बनली नंबर वन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 15:21 IST

आपल्या हॉट फोटोशूटमुळे ही अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत असते.

2020च्या सुरूवातीला बॉलिवूडच्या तीन अभिनेत्रींची ट्विटरवरची लोकप्रियता सध्या चर्चेचा विषय आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्यानुसार, गेल्या काही दिवसांमध्ये ट्विटरवर दिशा पाटनी, प्रियंका चोप्रा जोनस आणि दीपिका पादुकोणचेच अधिराज्य असलेले दिसून येत आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आकडेवारीनुसार, दिशा पाटनी ट्विटरवर सर्वाधिक प्रसिध्द असलेली अभिनेत्री असून लोकप्रियतेमध्ये तिने बॉलिवूडमध्ये तिच्याहुन सीनियर असलेल्या प्रियंका चोप्रा जोनास आणि दीपिका पादुकोण ह्या आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे.

लोकप्रियतेत पहिल्यांदाच दिशाने प्रियंका आणि दीपिकाला टक्कर देत 100 गुणांसह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर ट्विटरवरच्या लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये नंबर वन स्थान पटकावलंय. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

 दिशाच्या मलंग सिनेमाच्या फस्ट लुकमुळे युवावर्गाचे ध्यान तिने आकर्षित करून घेतले. 2020च्या सुरूवातीलाच ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय बनलेल्या या अभिनेत्रीच्या आकर्षक शरीरयष्टीमुळेही दिशा युथमध्ये सध्या चांगलीच प्रसिध्द आहे.

 दुस-या स्थानी असलेली ग्लोबल आइकॉन प्रियंका चोप्रा जोनस तर सध्या जगप्रसिध्द असल्याने जगभरातून तिला ट्विटरवर फॅनफॉलोविंग लाभलेली आहे. त्यामुळेच 98 गुणांसह प्रियंका चोप्रा जोनस ट्विटरवर लोकप्रिय असलेली दुसरी अभिनेत्री बनलीय आहे. 84 गुणांसह दीपिकाने लोकप्रियतेत तिसरे स्थान पटकावले आहे.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “ युवावर्गात अभिनेत्री दिशा पाटनीची सध्या चांगलीच लोकप्रियता आहे. ट्विटरवर तिच्या प्रत्येक पोस्टवर तरूणवर्गाची प्रतिक्रिया आणि पेजवरची एंगेजमेंट पाहून तिच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येतो. प्रियंका चोप्राच्या ट्विटर पेजवर ग्लोबली सक्रिय दिसुन आलीय. प्रियंका-नीकच्या फोटोला त्यांच्या चाहत्यांची जास्त पसंती दिसून आलीय. “

 अश्वनी कौल पुढे सांगतात , "आम्ही मीडिया विश्लेषणासाठी 14 भाषांमध्ये 600 पेक्षा जास्त बातम्यांमधून डेटा संग्रहित करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, प्रिंट प्रकाशन, सोशल मीडिया, व्हायरल न्यूज, प्रकाशने आणि डिजिटल प्लेटफॉर्म समाविष्ट आहेत.”

टॅग्स :दिशा पाटनी