Join us

दिशा पटानी पुन्हा बिकनीतील फोटोमुळे आली चर्चेत, स्वतःला म्हणतेय 'अ‍ॅक्वामॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 15:01 IST

दिशा पटानीचा बिकनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

अभिनेत्री दिशा पटानी सतत या ना त्या कारणांनी चर्चेत असते. कधी टायगर श्रॉफमुळे, कधी आदित्य ठाकरेंसोबतच्या मैत्रीमुळे तर कधी हॉट फोटो व व्हिडीओंमुळे. मात्र आता तिने समुद्राच्या मध्यभागी बिकनीत असलेला फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिशा पटानीने नुकताच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ज्यात ती समुद्राच्या मध्यभागी पिवळ्या रंगाच्या बिकनीत दिसते आहे. तिने हा फोटो शेअर करत अॅक्वामॅन असल्यासारखे वाटत असल्याचे म्हटले आहे. दिशाच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. दिशाचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.

दिशा आणि टायगर श्रॉफ दोघांच्या प्रेमाच्या खुमासदार चर्चा रंगतात. दोघांनी कधीही होकार किंवा नकार दिला नाही.दिशा पटानी टायगरसह दिसत नसली तरी टायगरची बहिण कृष्णा श्रॉफ तिची खास मैत्रीण आहे.टायगर आणि दिशा यांनी कधीच त्यांच्या नात्याबाबत जाहीर कबुली दिली नाही.दोघेही याला खास मैत्री म्हणत असून माध्यमांसमोर मात्र त्यांचं नातं लपून राहिलेलं नाही.  मागील महिन्यात नोव्हेंबरमध्ये दोघे मालदीव व्हॅकेशनला गेले होते. यावेळी दोघांनी स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर दिशा पटानी शेवटची मलंग चित्रपटात दिसली होती. आता ती 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'मध्ये दिसणार आहे.यात ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी भेटीला येणार आहे.

यासोबतच, दिशा लवकरच 'एक विलेन 2' मध्ये दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन 'मलंग'चा दिग्दर्शक मोहित सूरी करणार आहे.

टॅग्स :दिशा पाटनीटायगर श्रॉफ