Join us

प्रेग्नंसीनंतर आता चर्चा ​करिनाच्या करिअरची!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 22:15 IST

करिना कपूर आई बनणार आहे. निश्चितपणे करिनाच नाही तर तिचे कुटुंबीय व तिच्या चाहत्यांसाठी ही गोड बातमी आहे. आत्तापर्यंत ...

करिना कपूर आई बनणार आहे. निश्चितपणे करिनाच नाही तर तिचे कुटुंबीय व तिच्या चाहत्यांसाठी ही गोड बातमी आहे. आत्तापर्यंत करिना प्रेग्नेंट असल्याची चर्चा होती. पण करिनाने याबद्दल सावध मौन बाळगले होते. पण आज सकाळी करिनाचा हबी अर्थात सैफ अली खान याने ही गोड बातमी सर्व चाहत्यांशी शेअर केली. येत्या डिसेंबरमध्ये आमच्या घरी पाळणा हलणार असल्याचे त्याने सांगितले. आता करिनाच्या प्रेग्नसीची बातमी येताच, तिच्या हातात असलेले चित्रपट आणि तिचे करिअर यावर चर्चा सुरु झाली आहे. प्रेग्नसीमुळे करिनाच्या हाती असलेल्या चित्रपटांचे काय होणार? आई बनण्यानंतर करिनाच्या करिअरवर किती परिणाम होणार? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. करिनाच्या पे्रग्नंसीमुळे ‘गोलमाल4’ हा चित्रपट प्रभावित होण्याची शक्यता आहे. अर्थात या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण गोलमालच्या तिन्ही सिक्वलमध्ये करिना होती. रोहित शेट्टीच्या गोलमालच्या चौथ्या सिक्वलमध्येही करिना असणार हे अटळ आहे. ‘गोलमाल4’ करिनाने साईन केल्याची चर्चा आहे. या चित्रपटाची शूटींग लवकरच सुरु होणार अशीही खबर आहे. पण आता करिना गर्भवती आहे, ही बातमी ब्रेक झाल्यानंतर ‘गोलमाल4’ चे शूटींग सुरु होते वा नाही, हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. बेगमच्या या चित्रपटाचे शूटींग सुरु होते वा ती हा चित्रपटच सोडते, नेमके काय होते, हे पाहायचे आहे...‘वीरा दी वेडींग’ या चित्रपट  करिनाच्या प्रेग्नसीमुळे सर्वाधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे.करिन, करिनाने आई बनण्याची चाहून लागताच नवे चित्रपट साईन करणे टाळले, अशी बातमी होती. मात्र या बातमीची चर्चा सुरु असतानाच सोनम कपूर हिने करिना ही ‘वीरा दी वेडींग’मध्ये दिसणार असल्याचे जाहिर केले. सोनम कपूरची बहीण रिया कपूर ही या चित्रपटाची निर्माती आहे. या चित्रपटाची शूटींग लवकरच सुरु होत आहे.  करिनाच्या प्रेग्नंसीमुळे सध्या हा चित्रपट प्रभावित होण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या मते, चित्रपट प्रभावित होऊ न देण्यासाठी करिना व मेकर्स दोघांनाही शूटींगच्या डेट्समध्ये बदल करावे लागतील. असे झाले तर कदाचित चित्रपट प्रभावित होणार नाही.अनेक जाणकारांच्या मते, प्रेग्नंसीमुळे करिनाच्या फिल्मी करिअरवर फारसा प्रभाव पडण्याची शक्यता नाही. करिना ही ए1 अभिनेत्री आहेत. अनेक अभिनेत्री लग्नानंतर वा आई बनल्यानंतरही यशस्वी करिअर करताहेत.काजोल, ऐश्वर्या हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळेच आई बनल्यानंतर करिनाचे फिल्मी करिअर अगदीच संपुष्टात येईल, असे होणार नाही.............................प्रेग्नेंट असताना करिनाला हातात असलेले चित्रपट पूर्ण करावे लागणार आहेत. पण असे करणारी करिना एकटी नाही तर यापूर्वीही अनेक अभिनेत्रींनी प्रेग्नेंट असताना हाती असलेले चित्रपट पूर्ण केले आहेत.श्रीदेवी : १९९४ मध्ये रिलीज झालेल्या ‘जुदाई’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान श्रीदेवी गर्भवती होती. या चित्रपटानंतर श्रीदेवीने चित्रपट स्वीकारणे थांबवले. ‘हमारा दिल आपके पास है’ या चित्रपटासाठी आधी श्रीदेवीचे नाव जाहिर झाले होते. पण गर्भवती असल्याचे कळल्यानंतर या चित्रपटाला श्रीदेवीने स्वत:हून नकार दिला होता.जुही चावला : ‘एक रिश्ता’ आणि ‘आमदनी अठन्नी खर्चा रूपय्या’ या चित्रपटाच्या शूटींग दरम्यान जुही चावला प्रेग्नेंट होती. दुसºया प्रेग्नंसीदरम्यानही तिने ‘झंकार बीट्स’ या चित्रपटाचे शूटींग पूर्ण केले.काजोल : काजोलला दुसºयांदा आई बनण्याची चाहूल लागली तेव्हा ती करण जोहरच्या ‘वी आर फॅमिली’चे शूटींग करीत होती. शिवाय अजय देवगण सोबत ‘टुनपूर की हिरो’ हा चित्रपटही तिच्या हाती होता. हे दोन्ही चित्रपट काजोलने पूर्ण केले.कोंकणा सेन : कोंकणा सेन ‘मिर्च’ तसेच ‘राईट या राँग’ या दोन चित्रपटाच्या शूटींगदरम्यान प्रेग्नंट होती. मात्र तिने दोन्हींचे शूटींग पूर्ण केले.cnxoldfiles/strong>ऐश्वर्या रॉय बच्चन मधूर भांडारकरच्या ‘हिरोईन’मध्ये दिसणार होती. मात्र पे्रग्नंसीमुळे ऐश्वर्याला हा चित्रपट नाकारावा लागला. नंतर यात करिना कपूर दिसली.