Join us

‘लाली की शादी में लड्डू दीवाना’चा दिग्दर्शक म्हणतो, भर चौकात फासावर लटकावे वाटतेयं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 12:42 IST

अभिनेत्री अक्षरा हासन, विवान शहा आणि गुरमीत चौधरी स्टारर ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित ...

अभिनेत्री अक्षरा हासन, विवान शहा आणि गुरमीत चौधरी स्टारर ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. पण या चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष हरिशंकर यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार घोळत आहेत. धक्का बसला ना? पण हे खरे आहे. मनीष यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर तसे म्हटले आहे. मी आत्महत्या करू इच्छितो, असे त्यांनी म्हणलेय. आता यामागचे कारण काय तर, ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’ या चित्रपटाला काही तथाकथित  संस्कृती रक्षक संघटनांनी चालवलेला विरोध. सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट कुठल्याही कटशिवाय पास केला आहे. पण काही संघटनांनी या चित्रपटावर बंदी लादण्याची माणगी केली आहे. याचे कारण म्हणजे, या चित्रपटात मनीष यांनी एका गर्भवती महिलेच्या लग्नाचा सीन दाखवला आहे. या चित्रीत दृश्याला संबंधित संघटनांचा विरोध आहे.या विरोधामुळे मनीष प्रचंड निराश आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’  या चित्रपटासाठी मी आयुष्याची पाच वर्षे दिली आहेत. तीन वर्षे स्क्रिप्टिंग आणि दोन वर्षे याचे शूटींग. सेन्सॉर बोर्डाने माझा चित्रपट पास केला. पण काही परंपरावादी विचारांमुळे माझ्या चित्रपटाच्या रिलीजमध्ये अडचणी येत आहे. एखाद्या चौकात स्वत:ला फासावर लटकवावे आणि लोकांनी हा तमाशा बघावा, असे मला वाटतेय, असे मनीष यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.ALSO READ :  ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’च्या प्रमोशनपासून का दूर पळतेय अक्षरा हासन?अलीकडे एका कट्टरवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटाविरोधात निदर्शने केली होती. चित्रपटाचे निर्माते टीपी अग्रवाल यांच्या कार्यालयाबाहेर त्यांनी चित्रपटाच्या पोस्टरवर क्रॉसचे चिन्ह बनवून या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली होती. ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’  हा चित्रपट येत्या ७ तारेखला प्रदर्शित होतो. तोपर्यंत आणखी काय काय घडामोडी घडतात, त्याकडे आमचे लक्ष असणार आहेच.