Join us

सारा अली खानला आपल्या चित्रपट घेण्यासाठी हा दिग्दर्शक हा उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 11:04 IST

सध्या बॉलिवूडमध्ये रोज स्टार किड्सच्या डेब्यूची चर्चा असते. स्टार किड्सच्या यादीत सैफ अली खान आणि त्याची पूर्व पत्नी अमृता ...

सध्या बॉलिवूडमध्ये रोज स्टार किड्सच्या डेब्यूची चर्चा असते. स्टार किड्सच्या यादीत सैफ अली खान आणि त्याची पूर्व पत्नी अमृता सिंगची मुलगी सारा अली खानचे नाव सगळ्यातवर असते. अभिषेक कपूरच्या केदारनाथमधून सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. सारा अली खानच्या डेब्यूवर सगळ्यांचेच लक्ष आहे. यावर्षी सार मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.  चित्रपट रिलीज होण्याच्या आधीपासूनच साराने अनेकांची मनं जिंकली आहेत.  सध्या साराला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी बॉलिवूडमधले अनेक दिग्दर्शक उत्सुक आहेत यापैकी एक नाव आहे आशुतोष गोवारिकर. साराला नुकतेच आशुतोषच्या मुंबईतल्या खारमध्ये असलेल्या ऑफिसमधून बाहेर पडताना दिसली आहे. यावरुन अंदाज लावण्यात येतो आहे की सारा आशुतोषच्या आगामी चित्रपटात दिसू शकते. डिएनएच्या रिपोर्टनुसार आशुतोष आपल्या आगामी चित्रपटात अर्जुन कपूरसोबत साराला घेण्याचा विचार करतो आहे. हा एक ऐतिहासिक चित्रपट असले यात याची कथा 16व्या-18व्या शतकातील युद्धावर आधारित असेल. डीएनएच्या सूत्रांच्या माहितीनुसार आशुतोष साराचा परफॉर्मेंस बघून खूपच प्रभावित आहे त्याला साराला आपल्या चित्रपटात साईन करायचे आहे. आशुतोषच्या या बिग बजेट चित्रपटात संजय दत्तसुद्धा दिसणार आहे.  ALSO READ :  सैफची लेक सारा अली खानचा दिसला ग्लॅमर लूक, पाहा फोटो!सारा अली खान सुशांत सिंग राजपूतच्या अपोझिट केदारनाथ चित्रपटात झळकणार आहे.  हा चित्रपट २०१३ मध्ये ‘केदारनाथ’मध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेट डोरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न प्रकारची आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर असतील यात काही शंका नाही. सारा एका श्रीमांत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो.  'केदारनाथ’ हा चित्रपट एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे.