Join us

जेब वी मेटनंतर पुन्हा एकदा जमणार शाहिद कपूरसोबत या दिग्दर्शकाची जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 15:11 IST

काही दिवसांपूर्वीच अशी माहिती मिळाली होती की शाहिद कपूर दिग्दर्शक इम्तियाज अलीचा आगामी चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

काही दिवसांपूर्वीच अशी माहिती मिळाली होती की शाहिद कपूर दिग्दर्शक इम्तियाज अलीचा आगामी चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या गोष्टीला स्वत: शाहिद कपूर दुजोरा दिला आहे. एक दशकानंतर शाहिद आणि इम्तियाज अली पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. याआधी जब वी मेटमध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. जो चित्रपट 2007मध्ये रिलीज झाला होता.   आगामी चित्रपटाबाबत बोलताना शाहिद म्हणाला की, मला असे वाटते इम्तियाज अली हा एक खूप गुणी फिल्ममेकर आहे. आम्ही दोघांनी करिअरच्या सुरुवाताला एक चित्रपट केला होता ज्याबद्दल आम्ही आजही बोलत असतो. जब वी मेट माझ्यासाठी स्पेशल चित्रपट होता. तसेच खूप लवकरच आम्ही काही तरी चांगले करायला जातोय. मी यासाठी खूप एक्साइडेट आहे. ‘जब वी मेट’मध्ये शाहिद कपूरने आदित्य कश्यप नावाच्या मुलाची भूमिका साकारली होती.     शाहिद कपूर इम्तियाज अलीच्या चित्रपटाची शूटिंग सुरु करण्यापूर्वी श्रीनारायण सिंग यांच्या बत्ती गुल मीटर चालू चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. ज्यात त्याच्यासोबत वाणी कपूर दिसणार आहे. बत्ती गुल चित्रपटाचे शूटिंग 2018च्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरु करण्यात येणार आहे. शाहिद कपूर या चित्रपटात वकिलाची भूमिका साकारणार आहे. तसेच चित्रपटात अभिषेक बच्चन यांच्यादेखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. प्रेरणा अरोरा या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा चित्रपट वीजेच्या समस्येवर आधारित आहे.  शाहिद कपूर पद्मावतीमध्ये सुद्धा दिसणार आहे. ‘पद्मावती’ची रिलीज डेट अद्याप आलेली नाही. पण प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. ‘पद्मावती’साठी शाहिदने तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले.  तलवार चालवणे एक वेगळे कौशल्य आहे. पण हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेत. ३० ते ४० किलोची तलवार हातात घेऊन त्याचा मी हा सराव केला.  या चित्रपटात शाहिद कपूरने राणी पद्मावतीचा पती राजा रावल रतनसिंगची भूमिका साकारली आहे. संजय लीला भंसालींनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.