Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिग्दर्शक अभिषेक कपूरने सुशांतला वाहिली अनोखी श्रद्धांजली, 3400 कुटुंबीयांना जेवण देण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 07:00 IST

सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला आहे. सुशांतच्या निधनानंतर लाखो लोकांनी त्याला सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या पहिल्या सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि त्याची प्रज्ञा कपून यांनी सोशल मीडियावर सुशांतच्या स्मृतीत एक चांगल्या कार्याची घोषणा केली आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूरची पत्नी प्रज्ञा कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. 

या पोस्टमध्ये त्यांनी सुशांतचा फोटो शेअर करत सांगितले आहे की त्यांची संस्था सुशांतच्या स्मरणार्थ 3400 कुटुंबांना जेवण देणार आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की. लॉकडाऊन संपले आहे परंतु अद्याप उत्पन्न आणि नोकर्‍यांची कमतरता आहे. म्हणूनच आम्ही हा प्रयत्न करीत आहोत. या पोस्टसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले- ' आम्हाला कायम तुझी आठवण येईल.''

अभिषेक कपूर सुशांत सिंग राजपूतचा पहिला सिनेमा 'काय पो छे'चा दिग्दर्शक आहे. सुशांतने या चित्रपटासाठी 12 वेळा ऑडिशन दिले होते आणि पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. सुशांत आणि अभिषेक एकमेकांचे जवळचे मित्र होते. याच कारणामुळे अभिषेश आणि त्याची पत्नी प्रज्ञाने सुशांतच्या आठवणीत चांगले कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत