Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिशा पाटनीचा एका तरुणाने केला पाठलाग, कारजवळ गाठून केली ‘ही’ डिमांड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 20:52 IST

काही दिवसांपूर्वी अभिनेता टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दिशा पाटनी हिला जुहू येथील पीव्हीआरमध्ये बघण्यात आले. ब्लू रिप्ड जीन्स ...

काही दिवसांपूर्वी अभिनेता टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दिशा पाटनी हिला जुहू येथील पीव्हीआरमध्ये बघण्यात आले. ब्लू रिप्ड जीन्स आणि लाइट टी-शर्ट परिधान केलेली दिशा तिच्या एका मित्रासोबत पीव्हीआरबाहेर येत कारच्या दिशेने घाईने निघाले होते. याचदरम्यान, तिच्या एका चाहत्याने तिला बघितले आणि तिचा तो पाठलाग करू लागला. ही बाब कदाचित दिशाच्या लक्षात आली असावी, तिने लगेचच कार गाठली अन् कारमध्ये जाऊन बसली. परंतु हा चाहता त्याच्या फेव्हरेट अभिनेत्रीची भेट घेतल्याशिवाय काही राहिला नाही. त्यानेही कारच्या दिशेने धाव घेत दिशाला अखेर गाठलेच. दिशाजवळ आल्यानंतर तो फॅन तिच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी तिला रिक्वेस्ट करू लागला. त्याचा हट्ट पाहता दिशा त्याला नकार देऊ शकली नाही. तिने त्याच्यासोबत एक सेल्फी घेतली. दिशाला अखेरीस चायनीज सुपरस्टार जॅकी चॅन याच्या अपोझिट ‘कुंग फू योगा’मध्ये बघितले होते. बरेलीमध्ये जन्मलेली दिशा २०१३ मध्ये फेमिना मिस इंडिया इंदूरची रनर अप राहिली आहे. दिशा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. दिशाला अभिनेत्री नव्हे तर वैज्ञानिक बनायचे होते. आजही ती हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करीत आहे. २०११ मध्ये लखनऊ येथील एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये बायोटेकचे शिक्षण घेताना तिने फॅशन फिल्डमध्ये नशीब आजमाविले. त्यात तिला यश आले. पुढे २०१५ मध्ये तिने ‘लोफर’ या तेलगू चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पुढे २०१६ मध्ये आलेल्या ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. दिशा सध्या तिच्या सो-कॉल्ड बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत ‘बागी-२’मध्ये काम करीत आहे.