Join us

​ दिशा पटनी म्हणते, मला हाच हिरो हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 12:47 IST

‘एम.एस. धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री दिशा पटनी हिच्या हाताला सध्या काम नाहीयं. ...

‘एम.एस. धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री दिशा पटनी हिच्या हाताला सध्या काम नाहीयं.  ‘एम.एस. धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतच्या अपोझिट दिसली. तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले. यानंतर नाही म्हणायला, इंटरनॅशनल मेगास्टार जॅकी चॅनच्या चित्रपटाची लॉटरी दिशाला लागली. जॅकीच्या ‘कुंग फू योगा’मध्ये दिशाची वर्णी लागली. यानंतर दिशाची डिमांड अर्थातच वाढली. पण म्हणतात, ना काहींच्या डोक्यात हवा लवकरच शिरते ते. चांगल्या आॅफर्स स्वीकारण्याचे सोडून दिशा म्हणे अलीकडे अ‍ॅटीट्यूड दाखवू लागली आहे. मला हाच को-स्टार हवा, अशी मागणी करू लागली आहे. बॉलिवूडमध्ये सध्या तशीच चर्चा आहे.दिशाचे स्किल पाहून अनेक निर्मात्यांनी,मेकर्सनी तिच्याशी संपर्क साधला. पण दिशाची डिमांड लिस्ट पाहून सगळेच चाट पडले. रणबीर कपूर, रणवीर सिंह, वरूण धवन किंवा टायगर श्रॉफ यापैकी कुणी हिरो असेल तर मी काम करण्यास इंटरेस्टेड आहे, असे दिशाने या सगळ्यांना सुनावले. यापैकी कुणी नसेल तर दिशा म्हणे, स्क्रिप्ट ऐकायलाही राजी नाही. दिशाचे नाव अनेक चित्रपटांसाठी चर्चेत आहे.ALSO READ : एका भांडणामुळे दिशा पटनीवर आली अशी वेळ!!‘स्टुडंट आॅफ दी ईअर’,‘रॉ’,‘बागी2’ अशा अनेक चित्रपटात दिशा दिसणार म्हणून चर्चा आहे. पण अद्याप यापैकी एकाही चित्रपटात दिशाची वर्णी लागल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. कदाचित दिशा आलेल्या सगळ्या स्क्रिप्ट धुडकावून लावतेय, हेही त्यामागचे कारण असू शकते. खरे तर दिशाचे करिअर आत्ता कुठे जेमतेम सुरु झाले आहे. अशात इतका तोरा बरा नाही. ही गोष्ट लवकर कळण्यासाठी देव, दिशाला सुबुद्धी देवो, इतकेच काय ते आपण म्हणू.