राहुल बोस करणार चित्रपटाचे दिग्दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 16:33 IST
अभिनेता राहुल बोस १५ वर्षानंतर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. हा अनुभव अगदी रोमांचक होता, असे त्याने म्हटले आहे. ‘पूर्णा ...
राहुल बोस करणार चित्रपटाचे दिग्दर्शन
अभिनेता राहुल बोस १५ वर्षानंतर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. हा अनुभव अगदी रोमांचक होता, असे त्याने म्हटले आहे. ‘पूर्णा हा चित्रपट करताना खूप थ्रिल होते. यामध्ये माझे सर्वाधिक प्रेम असणारे तिन्ही भाग एकत्र आले. यात सिनेमा, स्पोर्टस् अॅडव्हेंचर आणि महिला सशक्तीकरण’ राहुलने २००१ साली एव्हरीबडी सेज आय एम फाईन हा चित्रपट केला होता.हा चित्रपट केल्यानंतर काम करण्याचा संपूर्ण आनंद मिळाला, असे राहुलने सांगितले.तेलंगणा येथील गरीब मुलगी मालवथ पूर्णा हिची ही खरीखुरी कथा आहे. २५ मे २०१४ रोजी माऊंट एव्हरेस्टवर चढत तिने इतिहास घडविला. पहाटे ६ वाजता भारतीय ध्वज फडकावताना ती १३ वर्षांची होती,’ असे राहुलने सांगितले.सलीम सुलेमान या चित्रपटाचे संगीतकार आहेत.