Join us

दिग्दर्शन माझं ‘पॅशन’ तर डान्स ‘लाईफलाईन’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 12:24 IST

 कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून ज्याची ख्याती आहे असा प्रभु देवा आता ‘तुतक तुतक तुतिया’च्या निमित्ताने चाहत्यांच्या भेटीला येतोय. ...

 कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून ज्याची ख्याती आहे असा प्रभु देवा आता ‘तुतक तुतक तुतिया’च्या निमित्ताने चाहत्यांच्या भेटीला येतोय. दिग्दर्शन की डान्स यापैकी तुला एक निवडावं लागलं तर तू काय निवडशील ? असे त्याला विचारण्यात आले असता तो म्हणाला की,‘ खरंतर, दिग्दर्शन हे माझं पॅशन आहे तर डान्स माझी लाईफलाईन.डान्सशिवाय मी कसा जगू शकेन. कलाकाराला व्यक्त होण्यासाठी सर्वांत मोठं माध्यम असतं ते म्हणजे डान्स. त्यामुळे एकवेळ मी दिग्दर्शनावर पाणी सोडेन पण डान्सला मी माझ्यापासून वेगळे करू शकत नाही.’