Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिप्पीने बांधली बॉडीगार्डला राखी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 11:50 IST

 रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊराया आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करणार असे वचन तिला देत असतो. आणि बहीण भाऊरायाला नेहमी साथ देईल ...

 रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊराया आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करणार असे वचन तिला देत असतो. आणि बहीण भाऊरायाला नेहमी साथ देईल असे वचन त्याला देते. ‘बी टाऊन’ च्या सेलिब्रिटींनीही काल रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला.त्यात डिप्पीने तर चक्क तिच्या बॉडीगार्डलाच राखी बांधून सण साजरा केला. म्हणजे खऱ्या  अर्थाने बॉडीगार्ड तिचा भाऊही झाला. जो व्यक्ती आपले रक्षण करतो तोच तर भाऊ असतो. नाही का? पण, डिप्पी तू तर तुझा वेगळा विचार आणि माणुसकी यातून उत्तमप्रकारे दाखवलीस.

#raksha #rakshabandhan #thankyoujalal