डिनरची होस्ट मीरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:24 IST
नु कतेच लग्न झालेले बॉलीवूडमधील कपल म्हणजे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत. त्यांची पहिलीच दिवाळी असून सगळीकडे सेलिब्रेशन मूड ...
डिनरची होस्ट मीरा
नु कतेच लग्न झालेले बॉलीवूडमधील कपल म्हणजे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत. त्यांची पहिलीच दिवाळी असून सगळीकडे सेलिब्रेशन मूड दिसत आहे. मीराने तिच्या सासरकडील मंडळीसाठी एका डिनर पार्टीचे आयोजन केले आहे. शाहीदची बहीण सनाह हिला सोबत घेऊन तिने बरेच मेनू ठरवले आहेत. सनाहने नुकतेच शाहीदच्या 'शानदार' चित्रपटात काम केले असून ती देखील तिच्या भाभीच्या डिनरसाठी तिनेही बरीच मदत केली आहे. जेव्हा शाहीद प्रवासात होता तेव्हा मीराने पूर्ण लक्ष देऊन सर्व तयारी करवून घेतली. मेनूबद्दल सांगतांना सनाह म्हणाली,' आम्हा सर्वांना पंजाबी फूड राजमा, चना, पनीर आणि मिठाई आवडते. पण आता जास्त काही विचारू नका. सर्व काही भाभीला माहिती आहे. मीरा खरंच खुप चांगली मुलगी असून आमच्या घराचा महत्त्वपूर्ण भाग फारच लवकर बनली. ती म्हणते की, मला भाभी म्हणत जाऊ नकोस कारण आम्ही सारख्या वयाच्या आहोत. तरीही मी तिला भाभीच म्हणते.'