Join us

डिंपल गर्लचा सक्सेस मंत्रा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 10:07 IST

 दीपिका पदुकोन आणि इम्तियाज अली हे एकमेकांचे चांगले मित्र तर आहेतच पण उत्तम दिग्दर्शक-कलाकार यांची जोडीही आहेत. ‘लव्ह आज ...

 दीपिका पदुकोन आणि इम्तियाज अली हे एकमेकांचे चांगले मित्र तर आहेतच पण उत्तम दिग्दर्शक-कलाकार यांची जोडीही आहेत. ‘लव्ह आज कल’ पासून ते तमाशा पर्यंत त्यांनी अनेक हिट चित्रपट मिळून साकारले.‘कॉक टेल’ ची स्टोरी देखील तिनेच लिहिली त्याबद्दल तिचे खुप कौतुक झाले. ‘जब वी मेट’ निर्मात्यांनी दिपीकाचे यश आणि तिचे टॅलेंटचे कौतुकच केले. दिवसेंदिवस तिच्यामध्ये होत असलेले बदल यांच्यामुळे तिचा सक्सेस मंत्रा नेमका काय आहे? हे माहिती नाही.पण इम्तियाज अली तमाशाच्या शूटींगदरम्यानचा किस्सा सांगताना म्हणाले की,‘ काही दिवसांपूर्वी जेव्हा आम्ही तमाशाची कोर्सिका येथे शूटिंग करत होतो. तेव्हा आम्ही दोघे वॉकवर गेलो. मी तिला विचारले की, आता तु बºयापैकी सर्व पुरस्कार मिळवले आहेस.आता नेक्स्ट तुझे ध्येय काय आहे? त्यावर तिने उत्तर दिले की,‘ मला माहिती नाही की, माझ्या पुढ्यात काय आहे? पण केवळ चांगले काम करणे एवढेच माझ्या हातात आहे आणि मी तेच करत राहणार. खरंतर हाच माझ्या यशाचा मंत्र असू शकतो.’